आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • India Can Win Cricket World Cup Sachin Tendulkar

भारत जिंकू शकतो विश्वचषक, सचिन तेंडूलकरने व्यक्त केला विश्‍वास

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लंडन - पुढील वर्षी होणारा एकदिवसीय विश्वचषक जिंकण्याची सर्वाधिक संधी भारतीय संघाला असून त्यात फिरकी गोलंदाज महत्त्वाची भूमिका बजावू शकतात, असे मत विश्वविक्रमी भारतीय फलंदाज सचिन तेंडुलकर याने व्यक्त केले. लॉर्ड््स क्रिकेट मैदानावर आयोजित सचिनच्या ‘प्लेइंग इट माय वे’ या आत्मचरित्रपर पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्याप्रसंगी तो बोलत होता. हा विश्वचषक ऑस्ट्रेलियन खंडात होत असल्याने सगळेच जण विश्वचषकात जलदगती गोलंदाजांचा बोलबाला राहण्याची शक्यता वर्तवत आहेत.
मात्र, माझ्या मते मैदानांचा आकार पाहता फ‍िरकी गोलंदाज हे महत्त्वाची भूमिका निभावतील, असे मला वाटते. माझ्या मते ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका, न्यूझीलंड आणि भारत हे चार संघ उपांत्य फेरीपर्यंत पोहोचू शकतील. त्यात भारतीय संघ इतरांना चकित करू शकतो, असे मला वाटत असल्याचे सचिनने या वेळी नमूद केले.

एमसीएकडून सचिनचा प्रस्ताव क्रीडा संघटनेकडे
मुंबईच्या शालेय क्रिकेटमधील सामन्यांमध्ये प्रत्यक्ष मैदानावर ११ खेळाडू खेळत असतानाच अन्य राखीव खेळाडूंनाही खेळण्याची आलटून पालटून संधी द्यावी, हा सचिन तेंडुलकरने मांडलेला प्रस्ताव मुंबई क्रिकेट असोसिएशनने मुंबई शालेय क्रिकेट संघटनेकडे पाठवला आहे.एमसीएचे संयुक्त सचिव शेट्टी यांनी यासंदर्भात सांगितले की, शालेय क्रिकेटचे नियंत्रण मुंबई शालेय क्रीडा संघटना करते, आम्ही नाही. त्यामुळे तेंडुलकरचा प्रस्ताव आम्ही त्यांच्याकडेच विचारविनिमय करण्यासाठी पाठवला.