आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • India Clash With Zimbabwe In First One Day International

विराट कोहलीच्‍या नेतृत्त्वाची परीक्षा, भारत-झिम्बाब्वे आज लढत

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

हरारे- भारत व झिम्बाब्वे यांच्यातील पाच एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेला बुधवारी प्रारंभ होत आहे. मालिकेतील पहिला सामना आज होणार आहे. भारतीय संघ 2010 नंतर झिम्बाब्वे दौ-यावर आला आहे. दुसरीकडे झिम्बाब्वे संघाने तब्बल 2002 पासून भारताचा दौरा केला नाही. या मालिकेच्या माध्यमातून दोन्ही देशांतील संबंधांना गती मिळणार आहे.
विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ विजयी मोहीम अबाधित ठेवण्यासाठी कटिबद्ध आहे. नुकतीच भारतीय संघाने इंग्लंडमध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी आणि वेस्ट इंडीजमध्ये तिरंगी मालिका जिंकली आहे.

भारतीय संघाचे स्टार खेळाडू
झिम्बाब्वेविरुद्ध सामन्यात भारतीय संघाची मदार कर्णधार विराट कोहली, रवींद्र जडेजा, शिखर धवन, यष्टिरक्षक फलंदाज दिनेश कार्तिक, चेतेश्वर पुजारा, सुरेश रैना, अंबाती रायडू आणि रोहित शर्मा यांच्यावर असणार आहे.
तीन गोलंदाजांवर खास नजर

भारतीय संघातील फिरकीपटू परेवझ रसूल, वेगवान गोलंदाज मोहित शर्मा आणि जयदेव उनाडकत यांच्यावर खास नजर असेल. आयपीएलमधील उल्लेखनीय कामगिरीच्या बळावर मोहित भारतीय संघात स्थान मिळवण्यात यशस्वी झाला आहे.

दुसरीकडे घरच्या मैदानावर चांगली कामगिरी करण्यासाठी झिम्बाब्वे संघाने कंबर कसली आहे. यजमानांनी टीम इंडियाविरुद्ध वन डे मालिकेसाठी 17 सदस्यीय संघात अनुभवी व दिग्गज खेळाडूंची निवड केली आहे. झिम्बाब्वेचा कर्णधार बी. टेलर, हॅमिल्टन मसाकाजा, सिकंदर राजा, मॅक्लम वालर, सीन विल्यम्स, काइल जारविस आणि ब्रायन विट्टोरीकडून घरच्या मैदानावर मालिकेतील पहिल्या एकदिवसीय सामन्यात चमकदार कामगिरीची आशा आहे.