आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टीम इंडियाची आगेकूच, आयसीसी कसोटी क्रमवारीत दुस-या स्‍थानी

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

दुबई- सोमवारी आयसीसीने जारी केलेल्‍या कसोटी क्रमवारीत टीम इंडियाने एका स्‍थानाची प्रगती करीत दुस-या स्‍थानी उडी घेतली आहे. दक्षिण आफ्रिकेने आपले अव्‍वल स्‍थान ताज्‍या क्रमवारीतही कायम ठेवले आहे.

इंग्‍लंडने भारताविरूद्धच्‍या मागील दोन्‍ही मालिकेत विजय मिळवला होता. त्‍यानंतरही विशेषत: पाकिस्‍तानकडून 0-3, दक्षिण आफ्रिकेकडून 0-2 पराभवानंतर आणि आठव्‍या क्रमांकावर असलेल्‍या न्‍यूझीलंडविरूद्धची मालिका अनिर्णीत राहिल्‍यामुळे इंग्‍लंड टीम इंडियाच्‍या मागे पडली.

परंतु, कुक आणि कंपनीला अ‍ॅशेजवर कब्‍जा मिळवता आला तर ते पुन्‍हा एकदा द्वितीय क्रमांकावर येऊ शकतात. येत्‍या 10 जुलैपासून टेंट्र ब्रिज येथे अ‍ॅशेज मालिका सुरू होणार आहे. इंग्‍लंडला पुन्‍हा दुसरे स्‍थान मिळवण्‍यासाठी ऑस्‍ट्रेलियाचा 3-0ने पराभव करणे आवश्‍यक आहे.

दक्षिण आफ्रिकेचे गुण 135 झाले असून ते द्वितीय क्रमांकावर असलेल्‍या टीम इंडियापेक्षा 19 गुणांनी पुढे आहेत. नुकताच आयसीसीने कसोटी, वनडे आणि टी-20 चे रॅकिंग दरवर्षी ऑगस्‍टऐवजी एक मेला करण्‍याचा निर्णय घेतला होता.