आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चॅम्पियन्‍स ट्रॉफी: टीम इंडिया सेमीफायनलमध्ये

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लंडन - डेवेन ब्राव्होच्या चेंडूवर शिखर धवनने थर्ड मॅनवर षटकार खेचून वनडे क्रिकेटमध्ये आपले शतक पूर्ण करून या शानदार प्रदर्शनाच्या बळावर भारताला आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी क्रिकेट स्पर्धेत सलग दुस-या विजयासह सेमीफायनलमध्ये पोहोचवले. शिखरने नाबाद 102 धावा काढल्या. आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीत भारताने सहजपणे वेस्ट इंडीजला 8 विकेटने हरवले. भारताच्या विजयात शिखरशिवाय रवींद्र जडेजा (5/36), रोहित शर्मा (52) आणि दिनेश कार्तिक (51*) यांनीही महत्त्वाची भूमिका बजावली.


किंगस्टन ओव्हलवर झालेल्या सामन्यात वेस्ट इंडीजने 9 बाद 133 धावा काढल्या. प्रत्युत्तरात भारताने 39.1 षटकांत दोन विकेटच्या मोबदल्यात 236 धावा काढून विजय मिळवला. ब गटात भारताचा तिसरा आणि अखेरचा सामना पाकिस्तानसोबत 15 जून रोजी होणार आहे.


चॅम्पियनसारखे प्रदर्शन : वर्ल्डकप विजेत्या भारतीय संघाने या सामन्यात चॅम्पियनसारखे प्रदर्शन केले. सुरुवातीला भारतीय गोलंदाजांनी टिच्चून गोलंदाजी केली आणि नंतर फलंदाजांनी वेस्ट इंडीजच्या गोलंदाजांना धडा शिकवला. विंडीजने 8 गोलंदाजांना आजमावले, मात्र त्यांना फक्त दोन विकेट घेता आल्या.


तत्पूर्वी किंगस्टन ओव्हलच्या मैदानावर जडेजाने शानदार गोलंदाजी केली. स्पर्धेत जडेजाची खास भूमिका असेल, असे स्पर्धेपूर्वीच कर्णधार धोनीने म्हटले होते. धोनीचे शब्द जडेजाने आपल्या सुरुवातीच्या दोन षटकांत खरे ठरवले. भारताने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. वेस्ट इंडीजचे सलामीवीर क्रिस गेल आणि चार्ल्स यांना रोखण्याचे कठीण आव्हान भारतासमोर होते. स्विंग गोलंदाजीत माहीर असलेल्या भुवनेश्वरकुमारने धोकादायक क्रिस गेलला (21) बाद केले. माजी कर्णधार डॅरेन सॅमीने आठव्या क्रमांकावर फलंदाजीस येऊन नाबाद (56) अर्धशतक ठोकले. सॅमीने 35 चेंडूंचा सामना करताना 4 षटकार आणि 5 चौकारांच्या मदतीने नाबाद 56 धावा ठोकल्या.


विजयाचे शिल्पकार
1 शिखर धवन : 102*, 107 चेंडू, 10 चौकार, 01 षटकार
2 रोहित शर्मा : 52 धावा, 56 चेंडू, 07 चौकार
3 रवींद्र जडेजा : 10-2-36-5
4 दिनेश कार्तिक : 51* धावा, 54 चेंडू, 08 चौकार


जडेजाच्या फिरकीत अडकले कॅरेबियन
तत्पूर्वी, डावखुरा फिरकीपटू रवींद्र जडेजाच्या शानदार गोलंदाजीमुळे वेस्ट इंडीजला मोठा स्कोअर करता आला नाही. जडेजाने 36 धावांत 5 गडी बाद केले. यामुळे विंडीजला 9 बाद 233 धावाच काढता आल्या.


उमेश यादव सर्वाधिक महागडा गोलंदाज
भारताकडून उमेश यादव सर्वाधिक महागडा गोलंदाज ठरला. त्याने 9 षटकांत 54 धावा देत 1 विकेट घेतली. भुवनेश्वर कुमार, ईशांत शर्मा यांनी आपल्या स्विंग गोलंदाजांने त्यांना बांधून ठेवले. या सर्वांनी आणि ऑफस्पिनर अश्विनने प्रत्येकी एक विकेट घेतली.


शिखरचे सलग तिसरे आंतरराष्‍ट्रीय शतक
शिखर धवनचे हे सलग तिसरे आंतरराष्‍ट्रीय शतक ठरले. यापूर्वी, त्याने ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटीत 187 धावांची खेळी केली होती. यानतंर चॅम्पियन्स ट्रॉफीत आफ्रिकेविरुद्ध 114 आणि आता मंगळवारी विंडीजविरुद्ध नाबाद 102 धावा काढल्या.


पाकिस्तान स्पर्धेबाहेर
ब गटात पाकिस्तानची टीम दोन पराभवानंतर स्पर्धेबाहेर झाली आहे. या गटातून दोन सामन्यांत विजय मिळवून भारत सेमीफायनलमध्ये पोहोचला आहे. वेस्ट इंडीज आणि दक्षिण आफ्रिका यांनी प्रत्येकी एक सामना जिंकला.


शिखर-रोहितची दुसरी द्विशतकी भागीदारी
पहिल्या सामन्यात शिखर धवन आणि रोहित शर्मा यांनी 127 धावांची भागीदारी केली होती. या दोघांनी या सामन्यातसुद्धा 101 धावांची भागीदारी केली. यानंतर दिनेश कार्तिक आणि शिखर धवन यांनी तिस-या विकेटसाठी नाबाद 109 धावा जोडल्या.


धावफलक
वेस्ट इंडीज धावा चेंडू 4 6
गेल झे. अश्विन गो. भुवन 21 18 4 0
चार्ल्स पायचित गो. जडेजा 60 55 7 2
डी. ब्राव्हो यष्टीचीत गो. अश्विन 35 83 2 0
सॅम्युअल्स पायचित गो. जडेजा 01 08 0 0
सरवन झे. धोनी गो. जडेजा 01 06 0 0
ब्राव्हो झे. जडेजा गो. यादव 25 40 3 0
पोलार्ड झे. भुवन गो. इशांत 22 32 0 2
डॅरेन सॅमी नाबाद 56 35 5 4
नारायण झे. कार्तिक गो.जडेजा 02 8 0 0
रामपॉल त्रि. गो. जडेजा 02 07 0 0
केमर रोच नाबाद 0 8 0 0
अवांतर : 8. एकूण : 50 षटकांत 9 बाद 233 धावा. गडी बाद होण्याचा क्रम : 1-25, 2-103, 3-105, 4-109, 5-140, 6-163, 7-171, 8-179, 9-182. गोलंदाजी : भुवनेश्वर 8-0-32-1, उमेश यादव 9-0-54-1, इशांत शर्मा 10-1-43-1, आर. अश्विन 9-2-36-1, विराट कोहली 4-0-26-0, जडेजा 10-2-36-5.
भारत धावा चेंडू 4 6
रोहित झे. चार्ल्स गो.नारायण 52 56 7 0
शिखर धवन नाबाद 102 107 10 1
विराट कोहली त्रि.गो. नारायण 22 18 4 0
दिनेश कार्तिक नाबाद 51 54 8 0
अवांतर : 9. एकूण : 39.1 षटकांत 2 बाद 236 धावा. गडी बाद होण्याचा क्रम : 1-101, 2-127. गोलंदाजी : केमार रोच 6-0-47-0, रवी रामपाल 6-0-28-0, सुनील नारायण 10-0-49-2, डी.सॅमी 4-0-23-0, डी.ब्राव्हो 5-0-36-0, मार्लोन सॅम्युअल्स 4-0-17-0, क्रिस गेल 1-0-11-0, केरोन पोलार्ड 3.1-0-21-0.
सामनावीर : रवींद्र जडेजा


पुढे वाचा... जॉन्‍सन चार्ल्‍सचे आक्रमक अर्धशतक.