आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

19 वर्षांखालील चौरंगी क्रिकेट मालिका: भारताची आफ्रिकेवर मात

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

विशाखापट्टणम - भारताच्या युवा संघाने दक्षिण आफ्रिकेवर 4 गडी आणि 63 चेंडू राखून 19 वर्षांखालील चौरंगी क्रिकेट स्पर्धेत दणदणीत विजय मिळवला. भारताकडून सरफराज खान (101) आणि रिकी भुई (94) यांनी विजयात योगदान दिले. दक्षिण आफ्रिकेने 8 बाद 270 धावा काढल्या. प्रत्युत्तरात भारताने 39.3 षटकांत 6 गड्यांच्या मोबदल्यात विजयी लक्ष्य गाठले. संघाचा कर्णधार विजय झोल (0) या सामन्यात चमकू शकला नाही.
रिकी भुई (94) आणि सरफराज खान (101) संघाचा डाव सावरत पाचव्या विकेटसाठी 169 धावांची भागीदारी केली. भुईने 95 चेंडूंत 12 चौकार आणि 3 षटकार लगावले.


संक्षिप्त धावफलक
दक्षिण आफ्रिका - क्लाइड फोरटून 90, लॉयर्ड ब्रॉन 63, बी. डिल 35 धावा. अभिमन्यू लांबा (3/55), चमा मिलिंद (3/52). भारत - रिकी भुई 94, सरफराज खान 101 धावा. जस्टिन दिल (2/34)