आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आशिया चषक हॉकी : भारताने बांगलादेशला 9-1 ने धुतले

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इपोह - ड्रॅग फ्लिकर रूपिंदरपालसिंग आणि व्ही. आर. रघुनाथ यांच्या प्रत्येकी चार गोलच्या बळावर भारताने आपले विजयी अभियान कायम ठेवताना बांगलादेशला 9-1 ने हरवले. रघुनाथने पाच ते आठ असे सलग तीन गोल करून हॅट्ट्रिक केली. आशिया चषक हॉकी स्पर्धेत भारताचा हा सलग तिसरा विजय ठरला आहे. आता सेमीफायनलमध्ये भारताचा सामना मलेशियाशी होईल. दुस-या सेमीफायनलमध्ये पाकिस्तान वि. कोरिया असतील.


दे दणादण गोल : रूपिंदरने सामन्याच्या तिस-या, 19 व्या, 27 व्या आणि 61 व्या मिनिटाला गोल केले. नितीन तिमैयाने 24 व्या मिनिटाला भारतासाठी तिसरा गोल केला. रघुनाथने 29 व्या मिनिटाला तर दुस-या हाफमध्ये रघुनाथने 47 व्या, 52 व्या, 60 व्या मिनिटाला गोल करून हॅट्ट्रिक केली. 61 व्या मिनिटाला रूपिंदरने गोल स्कोर 9-1 असा केला. भारताने 9 पैकी 6 गोल पेनॉल्टी कॉर्नरवर केले. बांगलादेशकडून एकच गोल झाला.