आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डेव्हिस चषक : भारताकडून चीन तैपेईचा 5-0 ने धुव्वा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इंदूर - यजमान भारतीय संघाने आशिया ओसासुना ग्रुप-1 डेव्हिस चषक टेनिस स्पर्धेत एकतर्फी विजय मिळवला. या टीमने चीन तैपेईचा 5-0 अशा फरकाने धुव्वा उडवला.युकी भांबरी आणि साकेत मेनेनीने एकेरीचे सामने जिंकून भारताचा एकतर्फी विजय निश्चित केला.
साकेतचा शानदार विजय
सोमदेव देववर्मनच्या जागी रविवारी एकेरीच्या पहिल्या लढतीत साकेत मेनेनीला खेळवण्याचा निर्णय घेण्यात आला. या वेळी टीमने टाकलेला विश्वास साकेतने सार्थकी लावला. जागतिक क्रमवारीत 313 व्या स्थानी असलेल्या साकेतने सामन्यात चीनच्या सुंग हुआ यांगला अवघ्या 48 मिनिटांत आक्रमक सर्व्हिस करताना सरळ दोन सेटमध्ये 6-1, 6-4 अशा फरकाने सामना जिंकला. यासह त्याने भारताला आघाडी मिळवून दिली. तैपेईनेही एकेरीच्या सामन्यादरम्यान बदल केला. या टीमने चेनला विश्रांती देऊन पेंगला एकेरीच्या लढतीत उतरवले. मात्र, युकीने हा निर्णय साफ चुकीचा ठरवला. त्याने पेंगला 7-5, 6-0 ने अशा फरकाने सरळ दोन सेटमध्ये पराभूत केले.
14 वर्षांनंतर भारताचा एकतर्फी विजय : तब्बल 14 वर्षांनंतर भारताने डेव्हिस चषकात एकतर्फी विजय मिळवला. यापूर्वी भारताने 2005 मध्ये पहिल्यांदा ही किमया साधली होती. दुस-यांदा भारताने चीन तैपेईचा धुव्वा उडवला. यापूर्वी 2009 मध्ये पाहुण्या भारतीय संघाने यजमान तैपेई टीमला घरच्या मैदानावर हरवले होते. भारताने एकतर्फी विजय मिळवला होता.