आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तिरंगी मालिका : भारत, श्रीलंकेची अंतिम फेरीत धडक; वेस्‍ट इंडिजला धक्‍का

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पोर्ट ऑफ स्पेन - तिरंगी मालिकेतील महत्त्वाच्‍या सामन्‍यात भारताने श्रीलंकेला 81 धावांनी पराभूत करुन अ‍ंतिम फेरीत धडक मारली. अंतिम सामन्‍यात हेच दोन्‍ही संघ भिडणार असून यजमान वेस्‍ट इंडिजला बाहेर पडावे लागले आहे. भारताने प्रथम फलंदाजी करताना 29 षटकारात 3 बाद 119 धावांपर्यंत मजल मारली. पावसाच्‍या अडथळ्यामुळे श्रीलंकेला डकवर्थ-लुईस नियमानुसार 26 षटकांत 178 धावांचे लक्ष्‍य ठेवण्‍यात आले होते. पण श्रीलंकेचा संपूर्ण संघ 24 षटकांमध्‍ये 96 धावांवर गारद झाला. भुवनेश्‍वर कुमार भारताचा हिरो ठरला. त्‍याने अफलातून कामगिरी केली. श्रीलंकेची आघाडीची फळी कापून काढताना त्‍याने 6 षटकांमध्‍ये 8 धावा देत 4 फलंदाज बाद केले.

तत्पूर्वी श्रीलंकेने नाणेफेक जिंकून प्रथम भारताला गोलंदाजीची संधी दिली. भारताची धावसंख्‍या जास्त होणार नाही याकडे श्रीलंकेने लक्ष दिले. मात्र त्याचा विजयात रूपांतर त्यांना करता आले नाही.

कर्णधार विराट कोहलीने 52 चेंडूंचा सामना करताना 4 चौकारांसह 31 धावांची खेळी केली. नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करणा-या टीम इंडियाचा शिखर धवन मोठी खेळी करू शकला नाही. तो 16 चेंडूंत 15 धावा काढून बाद झाला. त्याने दोन चौकार मारले. यानंतर रोहित शर्मा आणि कोहली यांनी दुस-या विकेटसाठी 49 धावांची मजबूत भागीदारी करून भारताचा डाव सावरला. कोहली स्थिरावला आहे, असे वाटत असतानाच रंगना हेराथने त्याला पायचित केले. चौथ्या क्रमांकावर खेळण्यास आलेल्या दिनेश कार्तिकला 12 धावांवर फिरकीपटू हेराथने त्रिफळाचीत केले. कार्तिकने 18 चेंडूंचा सामना करताना एक षटकार मारला होता. श्रीलंकेकडून गोलंदाजीत रंगना हेराथने 32 धावांत 2 तर मॅथ्यूजने 5 धावांत एक विकेट घेतली.

सात वर्षांनंतर पुनरागमन
श्रीलंका संघाने वेगवान गोलंदाज दिलहारा लोकुहेतिगेला संधी दिली. त्याने तब्बल सात वर्षांनंतर आंतरराष्‍ट्रीय वनडेत पुनरागमन केले. 33 वर्षीय दिलहाराने यापूर्वी शेवटचा वनडे 12 नोव्हेंबर 2005 रोजी भारतविरुद्धच खेळला होता. अशा प्रकारे तो सात वर्षे 239 दिवसांनंतर वनडेत खेळत आहे. दोन वनडेतील अंतराचा हा विक्रम नाही. हा विक्रम न्यूझीलंडच्या जेफ विल्सनच्या नावे आहे. सहा वनडे खेळणा-या विल्सनच्या चौथ्या व पाचव्या सामन्यात 11 वर्षे 331 दिवसांचे अंतर होते.