आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • India England Cricket Match Latest News In Divya Marath

आज रंगनार भारत-इंग्लंड सामना

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दुबई- आयसीसी 19 वर्षांखालील विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत भारत आणि इंग्लंड यांच्यात उपांत्यपूर्व सामना शनिवारी रंगणार आहे. या सामन्याला सकाळी 11 वाजेपासून प्रारंभ होईल. फॉर्मात असलेल्या भारताचा युवा संघ विजयासह उपांत्य फेरीतील प्रवेशासाठी सज्ज झाला आहे. जालन्याचा खेळाडू आणि रनमशीन विजय झोलच्या नेतृत्वाखाली आतापर्यंत सलग तीन सामने जिंकले आहेत. आता विजयी चौकार मारून अंतिम चारमधील प्रवेश निश्चित करण्याचा युवा टीमचा प्रयत्न असेल. दुसरीकडे इंग्लंडचा युवा संघही विजयासाठी प्रयत्नशील असणार आहे.
भारताची मजबूत बाजू
इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात स्टार युवा फलंदाज सरफराज खान आणि संजू सॅमसन यांच्या रूपात भारताची मजबूत बाजू समोर आली आहे. हे दोघेही धडाकेबाज कामगिरीसाठी सज्ज झाले आहेत. आतापर्यंत शानदार फलंदाजी करून अखिल हेरवाडरकनेही स्पर्धेत आपला दबदबा निर्माण केला आहे. दुसरीकडे संजू सॅमसनपाठोपाठ सरफराज खानही जबरदस्त फॉर्मात आहे. सॅमसनने आतापर्यंत सॅमसनने दोन अर्धशतकांची खेळी केली आहे. तसेच सरफराजने आतापर्यंत दोन अर्धशतकांचे योगदान दिले.
दीपक, कुलदीप फॉर्मात
भारतीय युवा संघाचे दीपक हुडा आणि कुलदीप यादव फॉर्मात आहेत. उत्तर प्रदेशच्या कुलदीपने सलग दोन सामन्यांत बळीचा चौकार मारला. तसेच दीपकने पाकिस्तानविरुद्ध सामन्यात 41 धावांत पाच बळी घेण्याची सर्वोत्कृष्ट कामगिरी केली. त्यानंतर त्याने ही लय कायम ठेवत आतापर्यंत सात बळी घेतले.
पाकसमोर श्रीलंकेचे आव्हान
पाकिस्तानसमोर उपांत्यपूर्व लढतीत श्रीलंकेचे तगडे आव्हान असेल. भारताविरुद्ध सलामी सामन्यातील पराभवातून सावरलेल्या पाकिस्तान संघाने स्पर्धेत पुनरागमन केले आहे. मात्र, या टीमला आता श्रीलंकेच्या आव्हानाला सामोरे जावे लागेल. श्रीलंकेचा संघही फॉर्मात आहे. त्यामुळे पाकला मोठी कसरत करावी लागणार आहे.
संभाव्य संघ
भारत : विजय झोल (कर्णधार), आवेश खान, अंकुश बैन्स, रिकी भुई, सरफराज खान, संजू सॅमसन, अखिल हेरवाडकर, अमीर गणी, दीपक हुडा, श्रेयस अय्यर, करण कैला, चामा मिलिंद, कुलदीप यादव, मोनू कुमार, अतीत शेठ.
इंग्लंड : विल रोड्स (कर्णधार), जोनाथन टॅटेर्सेल, एड बर्नाड, जोई क्लार्क, बेन डकेट, हॅरी फिंच, मॅथ्यू फिशर, मिल्स हॅमोंड, रेयॉन हिग्गीस, रॉब जोन्स, रॉब सोयर, जोश शॉव, लूक वूड.
इंग्लंडविरुद्ध भारताचा दबदबा : इंग्लंडविरुद्ध भारतीय संघाचा दबदबा राहिलेला आहे. आतापर्यंत या दोन्ही संघांत 7 सामने झाले. त्यातील सहा सामने भारताने जिंकले.
आज होणारे सामने
भारत विरुद्ध इंग्लंड
बांगलादेश विरुद्ध कॅनडा
झिम्बाब्वे विरुद्ध नामिबिया
पाकिस्तान विरुद्ध श्रीलंका