मोहाली- भारत आणि इंग्लंड यांच्यातील वनडे मालिकेतील चौथा सामना बुधवारी मोहालीत होत आहे. टीम इंडिया या मालिकेत २-१ ने पुढे आहे. दरम्यान, मोहलीतील सामना जिंकून मालिका बरोबरीत आणण्यासाठी इंग्लंडच्या टीमचा जोरदार प्रयत्न असून त्याचाच भाग म्हणून इंग्लिश खेळाडूंनी सोमवारी दिवसभर मैदानात घाम गाळला. उत्तर भारतात थंडीची लाट असली तरी, मोहालीत लख्ख सुर्यप्रकाश पडताच इंग्लिश खेळाडूंनी फलंदाजी व गोलंदाजी जोरदार सराव केला.