लंडन।मुंबई - दुस-या कसोटीच्या पहिल्याच दिवशी अजिंक्य रहाणेसोबत 90 धावांची भागीदारी करणा-या भुवनेश्वर कुमारने (4/46) दुस-या दिवशी आपल्या स्विंगने इंग्लंड टीमला बॅकफूटवर टाकले होते. मात्र, गॅरी बॅलेन्सच्या (11) शतकाने संकटात सापडलेल्या इंग्लंडच्या डावाला कलाटणी दिली. त्यामुळे यजमान इंग्लंडला दुस-या दिवसअखेर, शुक्रवारी पहिल्या डावात 6 गड्यांच्या मोबदल्यात 129 धावा काढता आला. अद्याप इंग्लंड संघ 76 धावांनी मागे आहे. यजमानांकडे अद्याप चार विकेट शिल्लक आहेत. इंग्लंडकडून बॅलेन्सने शतकी खेळी करून संघाचा डाव सावरला. त्याने 203 चेंडूंचा सामना करताना 15 चौकारांच्या आधारे 110 धावा काढल्या. प्लकेंट (4) आणि मॅट प्रायर (2) हे दोघे मैदानावर खेळत आहे.तत्पूर्वी, भारताने पहिल्या डावात 295 धावांची खेळी केली. यात शमीने 19 आणि ईशांतने नाबाद 12 धावा काढल्या.
लॉर्ड्सवर सुरू झालेल्या दुस-या कसोटीच्या पहिल्या दिवशी गुरुवारी भुवनेश्वरने 36 धावांची खेळी केली होती. याशिवाय त्याने अजिंक्य रहाणेसोबत 90 धावांची भागीदारी करून संघाचा डाव सावरला. याच उल्लेखनीय कामगिरीची लय कायम ठेवत भुवनेश्वरने 23 षटकांत 46 धावा देऊन चार गडी बाद केले. त्याने कर्णधार कुकसह (10), रॉबसन (17) इयान बेल (16) आणि बॅलेन्स (110) या आघाडीच्या चौकडीला तंबूत पाठवले. त्यामुळे इंग्लंडचा दमदार सुरुवात करण्याचा प्रयत्नही अपयशी ठरला. भुवनेश्वर कुमारने 11 व्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर कुकला कर्णधार महेंद्रसिंग धोनीकरवी झेलबाद केले. त्यापाठोपाठ त्याने 14.1 षटकांत रॉबसनलाही धोनीकरवी झेलबाद केले.
धावफलक
कालच्या 9 बाद 290 धावांवरुन पुढे
भारत पहिला डाव धावा चेंडू 4 6
मो. शमी झे. कुक गो. स्ट्रोक 19 24 3 0
ईशांत शर्मा नाबाद 12 13 2 0
अवांतर : 28. एकूण : 91.4 षटकांत सर्वबाद 295 धावा. गडी बाद होण्याचा क्रम :1-11, 2-48, 3-86, 4-113, 5-123, 6-128, 7-145, 8-235, 9-275, 10-275. गोलंदाजी : अॅँडरसन 23-7-60-4, ब्रॉड 22-5-79-2, प्लंकेट 15-5-51-1, स्टोक्स 17.4-5-40-2, मोईन अली 14-2-38-1.
इंग्लंड पहिला डाव धावा चेंडू 4 6
कुक झे. धोनी गो. कुमार 10 29 2 0
रॉबसन झे. धोनी गो. कुमार 17 42 1 0
बॅलेन्स झे. धोनी गो. कुमार 110 203 15 0
बेल झे. जडेजा गो. कुमार 16 56 2 0
रूट पाचचित गो. जडेजा 13 50 0 0
अली पायचित गो. विजय 32 106 4 0
प्लंकेट नाबाद 04 22 0 0
प्रायर नाबाद 02 11 0 0
अवांतर : 15. एकूण : 86 षटकांत 6 बाद 219 धावा.
गडी बाद होण्याचा क्रम :1-22, 2-31, 3-70, 4-113, 5-211, 6-214. गोलंदाजी : भुवनेश्वर कुमार 23-9-46-4, मो. शमी 15-5-33-0, इशांत शर्मा 17-5-32-0, बिन्नी 10-0-45-0, रविंद्र जडेजा 18-1-41-1, मुरली विजय 3-0-12-1.
सल्ला आमरेंचा; मेहनत अजिंक्यची
लॉर्ड्सवर त्याचे पहिले पाऊल पडले त्या वेळी इंग्लंडविरुद्ध दुस-या क्रिकेट कसोटीत भारताची अवस्था 3 बाद 86 होती. त्यानंतर दुस-या टोकाकडून तो 7 बाद 145 अशी भारताची झालेली पडझड पाहत होता. तो माघारी परतला तेव्हा भारताच्या धावफलकावर 9 बाद 275 धावा लागल्या होत्या आणि त्याच्या नावावर शतक... अजिंक्य रहाणेने लॉर्ड्सवरील पहिल्याच पावलात हा एक दुर्मिळ मान मिळविला होता.
त्यापेक्षाही त्याचे महान कार्य म्हणजे त्याने तळाच्या फलंदाजांना साथीला घेऊन धावसंख्या दुपटीने वाढविली होती. हिरव्याकंच खेळपट्टीवर चेंडू हातभर स्विंग होत असतानाही तो अविचल राहिला. मानसिक कणखरतेची क्षमता दाखवून दिली. अजिंक्यचे मार्गदर्शक, गुरू इत्यादी... इत्यादी... असलेल्या माजी कसोटीपटू प्रवीण आमरे यांचे मार्गदर्शन कामी येत आहे. प्रवीण आमरे म्हणत होते, ‘‘एकेकाळी अजिंक्य तंत्रशुद्ध फलंदाज असूनही मानसिक क्षमतेत कमी पडत होता. माझ्याकडे मार्गदर्शनासाठी आला त्या वेळी मी त्याच्यातील हाच न्यूनगंड दूर केला. ऑस्ट्रेलियाविरुद्ध पर्दापणातील कसोटीत केलेल्या सुमार कामगिरीने त्याच्यावर टीका झाली होती.