आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • India England Test Match News In Marathi, Divya Marathi

भुवनेश्वर, मुरली चमकले, तिसर्‍या दिवसाअखेर भारत 145 धावांनी आघाडीवर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लंडन - इंग्लंडविरुद्धच्या दुसर्‍या कसोटीच्या दुसर्‍या डावात भारताने तिसर्‍या दिवसअखेर 63 षटकांत 4 बाद 169 धावांची मजल मारली. यासोबतच टीम इंडियाने इंग्लंडवर 145 धावांची आघाडी घेतली आहे. मुरली विजयने (59*) नाबाद अर्धशतक झळकावले. पुजारा 43 धावांवर बाद झाला.

तत्पूर्वी, वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमारच्या 6 विकेटच्या बळावर भारताने दुसर्‍या कसोटीच्या पहिल्या डावात इंग्लंडला 319 धावांवर रोखले. भुवनेश्वरने 82 धावांत 6 गडी बाद केले. प्रत्युत्तरात भारताचे सलामीवीर शिखर धवन आणि मुरली विजय यांनी सांभाळून खेळ करताना 13.6 षटकांत 40 धावांची सलामी दिली. धवनला इंग्लंडचा युवा गोलंदाज बेन स्टोक्सने बाद केले. दुसर्‍या डावातही तो 31 धावांचीच मजल गाठू शकला. त्याने 45 चेंडूंत 4 चौकारांच्या मदतीने ही खेळी साकारली. यानंतर दुसर्‍या विकेटसाठी मुरली विजयने चेतेश्वर पुजाराला सोबत घेत 78 धावांची भागीदारी केली. पुजाराचे अर्धशतक 7 धावांनी हुकले. त्याने 83 चेंडूंत 7 चौकार लगावत 43 धावा काढल्या. त्याला प्लंकेटने यष्टिरक्षक प्रायरकरवी झेलबाद केले. चौथ्या क्रमांकावर आलेला विराट कोहली दुसर्‍या डावातही फ्लॉप ठरला. पहिल्या डावात 25 धावा काढणारा कोहली दुसर्‍या डावात भोपळाही फोडू शकला नाही. पहिल्याच चेंडूवर प्लंकेटने त्याचा त्रिफळा उडवला. त्यानंतर आलेला पहिल्या डावातील शतकवीर अजिंक्य रहाणेदेखील स्वस्तात बाद झाला. अजिंक्य अवघ्या पाच धावांवर असताना ब्रॉडने त्याला उसळत्या चेंडूवर प्रायरकरवी झेलबाद केले. दरम्यान, एका टोकावरून संयमी फलंदाजी करत सलामीवीर मुरली विजयने नाबाद 59 धावा काढल्या. त्याने 190 चेंडूंत 7 चौकार खेचले. कर्णधार महेंद्रसिंग धोनी 12 धावांवर खेळत आहे.

धवन पुन्हा अपयशी
पहिल्या कसोटीत 12 आणि 29 धावा काढणारा सलामीवीर शिखर धवन दुसर्‍या कसोटीतही अपयशी ठरला. दुसर्‍या कसोटीत त्याने 7 आणि 31 धावा काढल्या. दोन्ही कसोटीतील त्याचे अपयश बोचणारे ठरले.

इंग्लंडची पहिल्या डावात दमछाक
कालच्या 6 बाद 219 वरून पुढे खेळताना इंग्लंडने प्लंकेटच्या अर्धशतकाच्या बळावर तीनशेचा टप्पा गाठला. तळाचा फलंदाज प्लंकेटने सातव्या क्रमांकावर फलंदाजी करताना 79 चेंडूंत 8 चौकारांसह नाबाद 55 धावा काढल्या. मॅट प्रायरने 42 चेंडूंत 4 चौकारांच्या मदतीने 23 धावांचे योगदान दिले. अष्टपैलू बेन स्टोक्स शून्यावर बाद झाला. भुवनेश्वरने त्याला त्रिफळाचीत करून इंग्लंडची 8 बाद 276 अशी अवस्था केली. स्टुअर्ट ब्रॉडने चार धावा काढल्या. प्लंकेट आणि अँडरसन यांनी दहाव्या विकेटसाठी 39 धावांची भागीदारी करून इंग्लंडला तीनशेचा टप्पा ओलांडून दिला. इंग्लंडने 24 धावांची आघाडी घेतली. अँडरसनने 19 धावा काढल्या. दुसर्‍या टोकाने प्लंकेट नाबाद राहिला. भुवनेश्वरने 6, तर रवींद्र जडेजाने 2, तर शमी आणि विजयने प्रत्येकी एक विकेट घेतली.

भारत पहिला डाव 295 धावा.
इंग्लंड कालच्या 9 बाद 290 धावांवरून पुढे इंग्लंड पहिला डाव धावा चेंडू 4 6
प्लंकेट नाबाद 55 79 8 0
प्रायर झे. धवन गो. शमी 23 42 4 0
स्टोक्स त्रि. गो. कुमार 00 08 0 0
ब्रॉड झे. धवन गो. कुमार 04 02 1 0
अँडरसन झे. रहाणे गो. जडेजा 19 21 3 0
अवांतर : 20. एकूण : 105.5 षटकांत सर्वबाद 319 धावा. गडी बाद होण्याचा क्रम :1-22, 2-31, 3-70, 4-113, 5-211, 6-214,7-265, 8-276, 9-280, 10-319. गोलंदाजी : भुवनेश्वर कुमार 31-10-82-6, मो. शमी 19-5-58-1, ईशांत शर्मा 24-5-61-0, बिन्नी 10-0-45-0, रवींद्र जडेजा 18.5-1-46-2, मुरली विजय 3-0-12-1.
भारत दुसरा डाव धावा चेंडू 4 6
मुरली विजय नाबाद 59 190 7 0
धवन झे. रूट गो. स्टोक्स 31 45 4 0
पुजारा झे. प्रायर गो. प्लंकेट 43 83 7 0
कोहली त्रि. गो. प्लंकेट 00 01 0 0
रहाणे झे. प्रायर गो. ब्रॅड 05 08 1 0
महेंद्रसिंग धोनी नाबाद 12 51 2 0
अवांतर : 19. एकूण : 63 षटकांत 4 बाद 169 धावा. गडी बाद होण्याचा क्रम :1-40, 2-118, 3-118, 4-123. गोलंदाजी : अँडरसन 18-7-36-0, ब्रॉड 14-5-41-1, प्लंकेट 12-5-24-2, स्टोक्स 13-2-35-1 मोईन अली 6-1-14-0.