आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • India England Test Match News In Marathi, Lords Ground, Divya Marathi

लॉडर्सवर 28 वर्षांपासून भारताला आहे विजयाची प्रतीक्षा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लंडन - ऐतिहासिक लॉडर्स मैदानावर भारत व इंग्लंडदरम्यान पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना येत्या 17 जुलैपासून होणार आहे. मालिकेतील पहिली कसोटी ड्रॉ झाली होती. लॉर्ड्सवर टीम इंडियाचा रेकॉर्ड मुळीच चांगला नाही. भारताने लॉर्ड्सवर इंग्लंडविरुद्ध 16 कसोटी सामने खेळले. यात इंग्लंडने 11, तर भारताने एक विजय मिळवला. उर्वरित सामने ड्रॉ झाले.

भारताने 10 जून 1986 रोजी खेळलेला कसोटी सामना 5 विकेटने जिंकला होता. त्या सामन्यात भारताकडून दिलीप वेंगसरकरने 126 धावा काढल्या होत्या. इंग्लंडने प्रथम फलंदाजी करताना 294 धावा काढल्या. यात ग्रॅहम गुचने 114 धावा झळकावल्या. चेतन शर्माने 5 तर रॉजर बिन्नीने 3 गडी बाद केले होते. प्रत्युत्तरात भारताने 341 धावा काढल्या. इंग्लंडचा दुसरा डाव 180 धावांत आटोपला. कपिलदेवने 4 विकेट आणि मनिंदरसिंगने 3 गडी बाद केले. प्रत्युत्तरात भारताने 5 बाद 136 धावा काढून विजय मिळवला.

42 धावांत भारताचा खुर्दा
24 जून 1974 रोजी झालेल्या सामन्यात इंग्लंडने एक डाव आणि 285 धावांनी विजय मिळवला. या सामन्याच्या दुस-या डावात भारताचा अवघ्या 42 धावांत खुर्दा उडाला. लॉर्ड्सवर हा धावांचा नीचांक आहे. त्या वेळी भारतीय संघात सुनील गावसकर, अजित वाडेकर, गुंडप्पा विश्वनाथ सारखे दिग्गज होते.

वेंगसरकरच्या नावे 3 शतके : लॉर्ड्सवर भारताकडून तीन शतके वेंगसरकरने ठोकली. त्याच्याशिवाय राहुल द्रविड, वीनू मंकड, गुंडप्पा विश्वनाथ, अजहरुद्दीन, गांगुली, रवी शास्त्री व अजित आगरकरने प्रत्येकी एक शतक ठोकले.

बेदी, कपिल सर्वात पुढे
गोलंदाजीत भारताकडून बिशनसिंग बेदी आणि कपिल देव यांनी सर्वाधिक प्रत्येकी 17 विकेट लॉडर्सवर घेतले. याशिवाय अनिल कुंबळेने 12, जहीर खानने 10, अमरसिंगने 10 आणि भागवत चंद्रशेखरने 10 गडी बाद केले.

16 कसोटी सामने दोन्ही संघांत
11 इंग्लंड, तर एक कसोटी भारताच्या नावे