आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारत-इंग्लंड खेळणार सर्वाधिक 20 कसोटी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - आगामी आठ वर्षांकरिता म्हणजेच 2015 ते 2023 पर्यंतच्या कालावधीत भारताने इंग्लंड, ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका या प्रमुख देशांना कसोटी सामने आयोजित करताना प्राधान्य दिले आहे. भारताने इंग्लंडबरोबर 20, ऑस्ट्रेलियाबरोबर 16 व दक्षिण आफ्रिकेबरोबर 12 अशा आठ वर्षांत एकूण 48 कसोटींचे आयोजन केले आहे. त्यातही भारताने कल्पकता दाखवून प्रेक्षकांना आकर्षित करणार्‍या या प्रमुख संघांचे अधिक कसोटी सामने स्वगृही ठेवले आहेत.

या तीन देशांना वर्षातील भारतीय क्रिकेट हंगामाची प्रमुख वेळ देऊन आपली आर्थिक आवक आणणारा ओघ कायम राहील, याची काळजी भारताने घेतली आहे. कसोटी मालिका व वनडे मालिकांचे वेगवेगळे आयोजन करूनही भारताने आर्थिक आघाडीवर कल्पकता दाखवली आहे.

आयसीसीच्या तीन प्रमुख स्पर्धांचे या आठ वर्षांच्या कालावधीत आयोजन करताना ‘काँट्रिब्युशन कॉस्ट’ अन्य 9 सदस्यांपेक्षा दुप्पट देणार्‍या भारताला नफ्यामध्ये 21.9 टक्के हिस्सा मिळणार आहे. उर्वरित नऊ सदस्य देशांना मिळून 12.6 टक्केच नफ्यातील हिस्सा मिळणार आहे.’ भारत ऑस्ट्रेलियाचा दौरा करताना 4 कसोटी व तिरंगी क्रिकेट मालिकेत खेळणार आहे. मात्र, भारताने कसोटी किंवा वनडे किंवा टी- 20 सामन्यांचे स्वतंत्र दौर्‍याची काळजी घेतली आहे.

2015 ते 2023 या कालावधीत भारत काय करणार?
- इंग्लंडविरुद्ध 4 कसोटी मालिका, व 5-5 कसोटींच्या स्वगृही व परदेशी.
- ऑस्ट्रेलियाविरुद्ध 4 कसोटी स्वगृही व 4 परदेशात खेळणार.स्वतंत्र वनडे मालिका.
- दक्षिण आफ्रिकेविरुद्ध आठ वर्षांत केवळ तीन कसोटी मालिका.
- न्यूझीलंड व र्शीलंकेबरोबर आठ वर्षांत केवळ दोन-दोन कसोटी मालिका.
- ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये विंडीज संघ भारतात 3 कसोटी व 5 वनडे खेळणार.
- 2015 मध्ये भारतात प्रथमच बांगलादेशविरुद्ध कसोटी मालिका.

(फोटो - संग्रहित छायाचित्र)