आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारताची आज हॅट्ट्रिक? बांगलादेशविरुद्ध लढत

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

ढाका - ट्वेंटी-20 वर्ल्डकपमध्ये गतविजेता वेस्ट इंडीज आणि पाकिस्तानला पराभूत केल्यानंतर आता शुक्रवारी टीम इंडिया स्पध्रेत विजयी हॅट्ट्रिक करण्यासाठी मैदानावर उतरेल. शुक्रवारी भारतासमोर यजमान बांगलादेशचे मजबूत आव्हान असेल. तिसर्‍या विजयासह टीम इंडियाचे सेमीफायनलचे स्थान पक्के होईल.

सुरुवातीच्या दोन सामन्यांत भारताने एकसंध म्हणून चांगली कामगिरी केली. वेस्ट इंडीजविरुद्ध युवराजच्या संथ फलंदाजीमुळे भारताचा नेट रनरेट थोडा प्रभावित निश्चित झाला. मात्र, बांगलादेशविरुद्ध रनरेट सुधारण्याचीही संधी धोनी ब्रिगेडकडे असेल. बांगलादेशला दुसर्‍या सामन्यात वेस्ट इंडीजने पराभवाचा धक्का दिला होता. त्या सामन्यात विंडीजची टीम 100 च्या आत गारद झाली होती.

युवराजचा हरवलेला फॉर्म वगळता भारतासाठी दुसरी कसलीही चिंतेची बाब नाही. विराट कोहली, सुरेश रैना, रोहित शर्मा यांनी युवीच्या सुमार फॉर्माची उणीव जाणवू दिली नाही. भारताचे फिरकीपटूसुद्धा जबरदस्त फॉर्मात आहेत. लेगस्पिनर अमित मिर्शाने दोन सामन्यांत सामनावीरचा पुरस्कार मिळवला आहे.

संभाव्य संघ
भारत : महेंद्रसिंग धोनी (कर्णधार), शिखर धवन, रोहित शर्मा, विराट कोहली, युवराज सिंग, सुरेश रैना, रवींद्र जडेजा, आर. अश्विन, अमित मिर्शा, भुवनेश्वर कुमार, मो. शमी, मोहित शर्मा, स्टुअर्ट बिन्नी, अजिंक्य रहाणे, वरुण अँरोन.

बांगलादेश : मुशाफिकूर रहीम (कर्णधार), तामिम इक्बाल, एनामुल हक, मोमिनुल हक, सकिब-उल-हसन, शब्बीर रहेमान, मोहुमुदाल्लाह रियाद, जियाऊर रहेमान, सोहाग गाजी, अल अमीन हुसेन, मुशर्रफ मुतरुजा, अब्दुर रज्जाक, नासीर हुसेन, शमसूर रहेमान, फरहाद रजा