आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • India Eye Win In 4th ODI To Keep Series Alive Against New Zealand

आज जिंका..अथवा नाचक्की; न्यूझीलंडची 2-0 ने आघाडी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

हॅमिल्टन - तिसरा वनडे सामना टाय झाल्यानंतर आता भारत-न्यूझीलंड यांच्यात मंगळवारी होणार्‍या चौथ्या एकदिवसीय सामन्यात कोणत्याही परिस्थितीत विजय मिळवण्याचे आव्हान टीम इंडियासमोर असेल. तिसरी लढत टाय झाल्यामुळे चौथ्या सामन्यातील रोमांच वाढला आहे. हा सामना जिंकून यजमान न्यूझीलंड मालिका विजयासाठी प्रयत्न करेल, तर या सामन्याद्वारे मालिकेत पुनरागमनासाठी कर्णधार धोनीच्या टीम इंडियाचा प्रयत्न असेल.

भारत आणि न्यूझीलंड यांच्यासाठी हा सामना महत्त्वपूर्ण आहे. मागचे सामने बघितले तर सर्व लढती रोमांचक वळणावर संपल्या. दोन्ही संघांनी एकमेकांना जोरदार टक्कर दिली आहे. शॉर्टपिच चेंडू भारतीयांसाठी अडचणीची बाब ठरली आहे. याचा सामना करताना शिखर धवन, रोहित शर्मा, सुरेश रैनासारख्या फलंदाजांना अडचण येत आहे. दुसरीकडे यजमान न्यूझीलंडचा संघ डेथ ओव्हरमध्ये दुबळे ठरत आहेत.

विजय खेचून आणण्याचे आव्हान
भारताने पहिला वनडे 24 तर दुसरा वनडे डकवर्थ लुईस नियमामुळे 15 धावांनी गमावला. तिसरा सामना टाय झाला. भारतीय संघाने तिन्ही सामन्यांत संघर्ष केला, मात्र विजय गाठता आला नाही. आता विजय खेचून आणण्याचे आव्हान टीम इंडियापुढे आहे.

सलामीवीरांची जबाबदारी वाढली
तिसर्‍या वनडेत अष्टपैलू रवींद्र जडेजाने नाबाद 66 धावांची खेळी करून पराभव टाळला. भारताचे सलामीवीर रोहित शर्मा (39) आणि शिखर धवन (28) मोठी खेळी करू शकले नाहीत. या दोघांकडून चौथ्या सामन्यात मोठ्या खेळीची आशा असेल.

दोन्ही संभाव्य संघ
भारत : महेंद्रसिंग धोनी (कर्णधार), रोहित शर्मा, शिखर धवन, विराट कोहली, सुरेश रैना, अजिंक्य रहाणे, स्टुअर्ट बिन्नी, अंबाती रायडू, रवींद्र जडेजा, आर. अश्विन, ईशांत शर्मा, मो. शमी, ईश्वर पांडे, भुवनेश्वरकुमार.

न्यूझीलंड : ब्रेंडन मॅक्लुम (कर्णधार), मार्टिन गुप्तिल, जेसी रायडर, केन विलियसन, रॉस टेलर, ब्रेंडन मॅक्लुम, कोरी अँडरसन, जेस निशाम, ल्युक रोंची, नॅथन मॅक्लुम, हामिश बेनेट, केली मिल्स, टीम साऊथी, मिशेल मॅक्लिनघन.