आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकाठमांडू - सहा वेळचा चॅम्पियन भारतीय संघाने सलग पाचव्यांदा सॅफ फुटबॉल स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. गतविजेत्या भारताने सोमवारी उपांत्य सामन्यात मालदीवचा पराभव केला. या संघाने रोमांचक लढतीत 1-0 अशा फरकाने विजय मिळवला. अर्नब मंडलने 86 व्या मिनिटाला केलेल्या गोलच्या बळावर भारताने सामना जिंकला. आता भारताचा अंतिम फेरीतील सामना अफगाणिस्तानशी होईल. यापूर्वी भारताने 2011 मध्ये झालेल्या अंतिम सामन्यात अफगाणिस्तानवर 4-0 ने एकतर्फी विजय मिळवला होता.
रविवारी अफगाणिस्तानने उपांत्य लढतीत यजमान नेपाळला 1-0 ने पराभूत केले. या विजयासह अफगाणिस्तानने दुस-यांदा फायनलमधील प्रवेश निश्चित केला. भारताची सुरुवात निराशाजनक झाली. मालदीवने सावध खेळी करताना मध्यंतरापूर्वी गोलसाठी प्रयत्न केला. पहिल्या हाफमध्ये ही रंगतदार लढत गोल शून्यने बरोबरीत होती. त्यानंतर अर्नबने 86 व्या मिनिटाला गोल करण्यात यश संपादन केले. या गोलच्या बळावर भारताने विजय मिळवला.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.