आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • India Has Chance To Win Odi Series In Zimbabwe Today

झिम्बाब्वे दौरा: आज मालिका विजयाची संधी, तिसरा वनडे हरारेत रंगणार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

हरारे- टीम इंडिया आणि यजमान झिम्बाब्वे यांच्यात तिसरा वनडे क्रिकेट सामना रविवारी रंगेल. पाच सामन्यांच्या मालिकेत भारतीय संघ सध्या 2-0 ने पुढे आहे. तिसर्‍या सामन्यातील विजयाने मालिका टीम इंडियाच्या नावे होईल. भारताच्या विजयाची मालिका खंडित करण्याचा प्रयत्न यजमान झिम्बाब्वेचा असेल.

भारताने पहिला वनडे कोहलीच्या शानदार शतकाच्या बळावर जिंकला होता. दुसर्‍या वनडेत सलामीवीर शिखर धवनने शतक ठोकले होते. दिल्लीच्या या दोन्ही खेळाडूंच्या शतकाने झिम्बाब्वेला बॅकफूटवर ठेवले. हरारेत तिसरा सामना झाल्यानंतर उर्वरित दोन सामने बुलावायो येथे एक आणि तीन ऑगस्ट रोजी होतील.

युवा खेळाडूंची चांगली कामगिरी
दुसर्‍या वनडेत 4 बाद 65 अशा संकटमय स्थितीतून टीम इंडियाने शानदार पुनरागमन केले. युवा खेळाडू दबावात सर्वश्रेष्ठ प्रदर्शन करू शकतात, हे यावरून सिद्ध होते. भारताने 8 बाद 294 चा मजबूत स्कोअर केला होता. नंतर झिम्बाब्वेला 236 धावांवर रोखले. भारताकडून जयदेव उनादकटने 41 धावांत 4 गडी बाद करून शानदार गोलंदाजी केली.

विराट, शिखर, उनाडकत चमकले
पहिल्या सामन्यात विराटने शतक तर अंबाती रायडूने अर्धशतक ठोकले होते. दुसर्‍या सामन्यात धवनने शतक तर दिनेश कार्तिकने अर्धशतक ठोकले. विराट, शिखर, कार्तिक फॉर्मात आहेत.

रोहित शर्मा, सुरेश रैनाकडून आशा
तिसर्‍या वनडेत आपले प्रमुख खेळाडू रोहित शर्मा आणि सुरेश रैना यांच्याकडून मोठ्या खेळीची आशा कर्णधार विराट कोहलीला असेल. या मालिकेत रोहित आणि रैनाला एकही मोठी खेळी करता आलेली नाही. ं

संभाव्य संघ
भारत : विराट कोहली (कर्णधार), शिखर धवन, रोहित शर्मा, अंबाती रायडू, सुरेश रैना, दिनेश कार्तिक, रवींद्र जडेजा, जयदेव उनाडकत, अमित मिश्रा, मो. शमी, विनयकुमार, मोहित शर्मा.
झिम्बाब्वे : ब्रेंडन टेलर (कर्णधार), सिंबादा, सिकंदर रजा, मसकादजा, एस. विल्यम्स, एम. वॉलर, चिगुंबुरा, उत्सया, जार्विस, विटोरी, चतारा, ग्रीम क्रिमर.