Home »Sports »Other Sports» India Holand Women Football Match

भारत-हॉलंड महिला फुटबॉलच्या थराराने चाहते रोमांचित

प्रतिनिधी | Jan 18, 2013, 10:30 AM IST

  • भारत-हॉलंड महिला फुटबॉलच्या थराराने चाहते रोमांचित

कोल्हापूर - फिफा मानांकनात 14 व्या स्थानावर असलेल्या हॉलंडच्या महिला फुटबॉल संघाने येथे झालेल्या मैत्रीपूर्ण सामन्यामध्ये भारताचा 2-0 असा पराभव केला. क्लब लिकिंग प्रोग्रामअंतर्गत ऑ ल इंडिया फुटबॉल फेडरेशनतर्फे आयोजित करण्यात आलेल्या या सामन्याचे संयोजन कोल्हापूर सॉकल असोसिएशनने केले होते. महाराष्‍ट्रात प्रथमच महिला फुटबॉलचा आंतररा ष्‍ट्री य सामना भरवण्यात आला होता.

येथील शाहू स्टेडियमवर दुपारी पावणेचार वाजता सामन्याला सुरुवात केली. भारतीय महिला खेळाडूंच्या तुलनेत हॉलंडचे उंचपुरे खेळाडू होते. त्यामुळे यांच्यापुढे भारतीय खेळाडूंचा टिकाव कसा लागणार अशी शंका होती. ती खरी ठरवत सामन्याच्या तिस -या मिनिटाला हॉलंडच्या 5 नंबरची जर्सी परिधान केलेल्या मायरूषा व्हिक्टोरिया हिने पहिला गोल नोंदवला आणि भारतीय संघावर दडपण टाकले.
यानंतर हॉलंडने प्रामुख्याने आक्रमक चढाई करण्याऐवजी बचावात्मक खेळ करण्यावर भर दिला. पहिल्या 45 मिनिटात हा एकच गोल नोंदवला गेला. भारताने आक्रमक चढाई करण्याचे अनेक प्रयत्न केले. यामध्ये भारताची परमेश्वरी देवी ही आघाडीवर होती. मात्र, हॉलंडच्या खेळाडूंनी ही आक्रमणे मोडून काढली. गोलपोस्टकडे येताना भारतीय खेळाडूंची धाव अपुरी पडत असल्याचे जाणवत होते.

मध्यंतरानंतर भारताने गोल चढवण्यासाठी अनेक चढाया केल्या, परंतु गोलमध्ये रूपांतर करण्यात खेळाडूंना यश आले नाही. अशातच खेळ संपण्यासाठी पंधरा मिनिटांचा खेळ बाकी असतानाच साल्व्हाना टिलेमन हिने दुसरा गोल नोंदवला. अखेरपर्यंत भारतीय खेळाडूंनी किमान एक गोल तरी व्हावा यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली, परंतु त्यात त्यांना यश आले नाही.
विजेत्या संघाला श्रीमंत छत्रपती शाहू महाराज, महापौर जयश्री सोनवणे, संभाजीराजे छत्रपती, वेस्टर्न फुटबॉल असोसिएशनचे उपाध्यक्ष मालोजीराजे छत्रपती, जिल्हाधिकारी राजाराम माने, महापालिका आयुक्त विजयालक्ष्मी बिदरी, जिल्हा पोलिस अधीक्षक विजयसिंह जाधव, कर्नल विजय मंडरा, एआयएफचे मुख्य पंच कर्नल गौतम कौर आदींच्या हस्ते खेळाडूंचा गौरव करण्यात आला. नेदरलँडच्या मायरूषा व्हिक्टोरिया आणि भारताच्या परमेश्वरीदेवी यांना उत्कृष्ट खेळाडू म्हणून गौरवण्यात आले.

मालोजीराजेंचे परिश्रम
फुटबॉल असोसिएशनच्या वेस्टर्न झोनचे उपाध्यक्ष मालोजीराजे छत्रपती यांच्या प्रयत्नातून हा सामना येथे खेळवण्यात आला. त्यांच्या नेतृत्वाखालील कोल्हापूर सॉकर असोसिएशनच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतल्याचे सामन्यावेळी जाणवत होते. खुद्द मालोजीराजे यांनी सामना सुरू झाल्यानंतरही स्टेडियममध्ये न बसता नियोजनासाठी कार्यकर्त्यांसमवेतच सामन्याचा आनंद लुटला.
भारत-हॉलंड महिला फुटबॉलच्या थराराने चाहते रोमांचित !

Next Article

Recommended