आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विजयाचा जल्‍लोष...रोहितने केला भांगडा तर कोहलीने दाखवली गंगनम स्‍टाईल

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बर्मिंगहॅम- इंग्‍लड असो की पाकिस्‍तान प्रत्‍येक संघ टीम इंडियाच्‍या यंग ब्रिगेडसमोर फुसके ठरले आहेत. शिखर धवनने तब्‍बल दोन वर्षांनंतर टीममध्‍ये पुनरागमन करून प्रतिस्‍पर्धी संघाच्‍या गोलंदाजांना अक्षरश: पळता भुई थोडे करून टाकले. त्‍याला अष्‍टपैलू रवींद्र जडेजानेही सुरेख साथ दिली.

रोहित शर्मा, विराट कोहली, ईशांत शर्मा, उमेश यादव, दिनेश कार्तिक, भुवनेश्‍वर कुमार... प्रत्‍येक खेळाडूने आपल्‍या कामगिरीने विदेशी भूमी गाजवली. त्‍यामुळे इंग्‍लंडला जाण्‍यापूर्वी टीम इंडियावर टीका करणा-यांना विजेतेपदामुळे चांगलीच चपराक बसली आहे.

इंग्‍लंडमध्‍ये झालेल्‍या चॅम्पियन्‍स ट्रॉफीमध्‍ये टीम इंडियाने एकही सामना गमावला नाही. इतकेच काय सराव सामन्‍यातही त्‍यांनी प्रत्‍येक संघाला चांगलेच ठोकून काढले.

इतक्‍या कठोर मेहनतीनंतर जेव्‍हा टीमने हा किताब मिळवला तेव्‍हा सर्व खेळाडूंनी नाचून आपला आनंद व्‍यक्‍त केला. रोहित शर्माने भांगडा तर विराट कोहलीने गंगनम स्‍टाईल डान्‍स केला. पुढच्‍या स्‍लाईडला क्लिक करून पाहा चॅम्पियन्‍स ट्रॉफीमधील टीम इंडियाचा दबंग चेहरा...