दुबई -
टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज इशांत शर्माला दुहेरी झटका लागला आहे. पहिले तर त्याला शाकाहारी जेवण मिळाले नाही आणि आता आयसीसीच्या आचारसंहितेचे उल्लंघन केल्याने त्याला दंड ठोठावण्यात आला आहे. शर्माने
आपल्या चुकीचा स्वीकार केला आहे, तर दुसरीकडे ऑस्ट्रेलिया टीमवर हळू ओवर रेटने गोलंदाजी केल्याने आयसीसीने दंड लावला आहे. ऑस्ट्रेलिया हा सामना चार गडी राखून जिंकण्यास यशस्वी ठरला आणि चारही सामन्यांच्या या सिरीजमध्ये त्याने 2-0 अशी बढत मिळाली आहे.
यामुळे इशांत शर्माला लागला दंड
वेगवान गोलंदाज इशांत शर्मावर खेळाच्या भावनेचा मान न ठेवण्याचा आरोप आहे. इशांतने सामन्यादरम्यान स्मिथला बाद केल्यानंतर काही वक्तव्य केले होते. हे दृश्य टीव्हीवर लाईव्ह दिसले, ज्यामध्ये इशांतने अपशब्दांचा वापर केला होता. इशांतने आपली चुक मानली आहे आणि सामन्याच्या रेफरीने दिलेल्या दंडाचा स्वीकार केला आहे.
पुन्हा चुक केली तर सामने खेळण्यावर येईल बंदी
आय़सीसीच्या एलिट पॅनलचे सामन्यांचे रेफरी जेफ क्रोब यांनी स्टीवन स्मिथच्या नेतृत्वात ऑस्ट्रेलियाच्या संघावर ठरावीक वेळेत तीन षटकार कमी टाकल्याचा दंड ठोठावला आहे. आयसीसीच्या नियमानुसार षटकारांचा वेग कमी झाल्याने संघाच्या प्रत्येक खेळाडूवर प्रत्येक षटकाराच्या कमीसाठी सामन्याच्या शुल्कातून 10 टक्के आणि कर्णधारावर याच्या दुप्पट दंड ठोठावला आहे.
पुढील स्लाईडवर वाचा, इशांत आणि रैना का झाले नाराज -