आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कुलदीपचा ‘चौकार’; भारत मजबूत स्थितीत

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

दांबुला- कुलदीप यादवने (4/86) शानदार गोलंदाजी करून भारतीय संघाला श्रीलंकेविरुद्ध 19 वर्षांखालील चारदिवसीय कसोटीत मजबूत स्थिती मिळवून दिली. प्रत्युत्तरात लंकेने तिसर्‍या दिवसअखेर 5 बाद 235 धावा काढल्या. श्रीलंकेकडून कुलशेखरा (76) व रमेश मेंडिस (14) हे दोघे खेळत आहेत. यजमानांचा संघ अद्याप 268 धावांनी पिछाडीवर आहे. भारताने बुधवारी दुसर्‍या दिवशी 7 बाद 503 धावांवर डाव घोषित केला.

लंकेने गुरुवारी 1 बाद 24 धावांवरून खेळायला सुरुवात केली. दरम्यान, डुमिंडू व कुलशेखराने लंकेला दमदार सुरुवात करून दिली. या दोघांनी दुसर्‍या गड्यासाठी 76 धावांची भागीदारी केली. मात्र, कुलदीपने ही जोडी फोडली. त्याने डुमिंडूला खजुरियाकरवी झेलबाद केले. डुमिंडूने 155 चेंडूंत पाच चौकारांसह 42 धावा काढल्या.
त्यापाठोपाठ कुलदीपने समरविक्रमला (17) त्रिफळाचीत करून संघाला दुसरा बळी मिळवून दिला. त्यानंतर पाचव्या क्रमांकावर आलेल्या भानुकाने कंबर कसली.

त्याने सलामीवीर कुलशेखरासोबत चौथ्या गड्यासाठी 82 धावांची भागीदारी केली. त्याला कुलदीपने हेरवाडकरकरवी झेलबाद केले. भानुकाने 100 चेंडूंत आठ चौकारांसह 56 धावांचे संघाला योगदान दिले. त्यापाठोपाठ सुमनगिरी (8) आल्यापावलीच तंबूत परतला. त्याला कुलदीपने बाद केले. कुलदीपने शानदार गोलंदाजी करून तिसरा दिवस गाजवला.

संक्षिप्त धावफलक : भारत - पहिला डाव-7 बाद 503(डाव घोषित) श्रीलंका - पहिला डाव-5 बाद 235 (कुलशेखरा नाबाद 76, डुमिंडू 42, भानुका 56, 4/86 कुलदीप यादव)