आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दुस-या वनडेत आफ्रिकेची भारतावर 134 धावांनी मात

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
डर्बन - पहिल्या वनडेत 141 धावांनी पराभव झाल्यानंतर दुस-या सामन्यात टीम इंडिया पुनरागमन करून अब्रू वाचवेल, असे वाटत होते. मात्र, असे घडले नाही. दुस-या सामन्यातही आफ्रिकेसमोर आयसीसी क्रमवारीत नंबर वन असलेल्या टीम इंडियाने लोटांगण घातले. आफ्रिकेने प्रथम फलंदाजी करताना 6 बाद 280 धावा काढल्या. प्रत्युत्तरात आफ्रिकेच्या वेगवान तोफखान्यापुढे भारताचा अवघ्या 35.1 षटकांत 146 धावांत धुव्वा उडाला. आफ्रिकेच्या दौ-यावर थाटात गेलेल्या धोनी ब्रिगेडची अवस्था निवडणुकीत डिपॉझिट जप्त झालेल्या उमेदवारासारखी लाजिरवाणी झाली आहे.
या विजयासह आफ्रिकेने तीन वनडे सामन्यांच्या मालिकेत 2-0 ने विजयी आघाडी घेतली आहे. धावांचा पाठलाग करताना भारतीय फलंदाजांनी गुडघे टेकले. रैना (36) वगळता इतर सर्व फलंदाजांनी ‘तू चल, मी आलोच..’ असे म्हणत जणूकाही खेळपट्टीवर फक्त हजेरी लावण्याचे काम केले. भारताकडून रोहित शर्मा (19), शिखर धवन (0), विराट कोहली (0), अजिंक्य रहाणे (8), धोनी (19) धावा काढून बाद झाले. जडेजाने 26 धावा काढल्या. आफ्रिकेकडून डेल स्टेनने 3 तर त्सोत्सोबेने 4 गडी बाद केले.
तत्पूर्वी यजमान आफ्रिकेने प्रथम फलंदाजी करताना डी. कॉक (106) आणि हाशिम आमला (100) यांच्या शतकांच्या बळावर 49 षटकांत 6 बाद 280 धावा काढल्या. कॉकने दर्जेदार खेळ करत 118 चेंडूंत 106 धावा काढल्या. सोबतच हाशिम आमलानेही 117 चेंडूंचा सामना करत 100 धावांची खेळी केली. या दोघांनी पहिल्या गड्यासाठी 194 धावांची भागीदारी केली. महत्प्रयासानंतर 36 व्या षटकात भारताला ही जोडी फोडण्यात यश मिळाले. फिरकीपटू आर. अश्विनने कॉकला रोहित शर्माकरवी झेलबाद करून भारताला पहिले यश मिळवून दिले. एकूण धावसंख्येत केवळ 5 धावांचीच भर पडली असताना जडेजाने डिव्हिलर्र्सला 3 धावांवर बाद करून आफ्रिकेला दुसरा झटका दिला.
सुमार गोलंदाजी
दुस-या वनडेत मोहंमद शमी वगळता अन्य एकही गोलंदाज अपेक्षेनुरूप गोलंदाजी करू शकला नाही. दौ-यात पहिल्यांदाच खेळायची संधी मिळालेल्या उमेश यादवने 6 षटकांत तब्बल 45 धावा मोजल्या, शमीने 8 षटकांत 48 धावा देत 3 बळी मिळवले, तर अश्विन व जडेजाने प्रत्येकी 1 बळी मिळवला. दुसरीकडे आफ्रिकेचे वेगवान गोलंदाज एकापेक्षा एक वरचढ ठरले. स्टेन, त्सोत्सोबे यांनी चांगली कामगिरी केली.
धावफलक
दक्षिण आफ्रिका धावा चेंडू 4 6
कॉक झे. रोहित गो. अश्विन 106 118 9 0
आमला झे. धोनी गो. शमी 100 117 8 0
डिव्हिलर्स यष्टी. धोनी गो. जडेजा 03 04 0 0
जेपी डुमिनी धावबाद 26 29 2 0
डेव्हिड मिलर त्रि. गो. शमी 00 03 0 0
कॅलिस त्रि. गो. शमी 10 14 2 0
मॅक्लारेन नाबाद 12 05 1 1
वर्नोन फिलेंडर नाबाद 14 05 3 0
अवांतर : 09. एकूण : 49 षटकांत 6 बाद 280 धावा. गोलंदाजी : उमेश यादव 6-0-45-0, मो. शमी 8-0-48-3, ईशांत शर्मा 7-0-38-0, आर. अश्विन 9-0-48-1, सुरेश रैना 6-0-32-0, कोहली 3-0-17-0, रवींद्र जडेजा 10-0-49-1.
भारत धावा चेंडू 4 6
रोहित झे. आमला गो. त्सोत्सोबे 19 26 2 0
धवन झे. डुमिनी गो. स्टेन 00 02 0 0
कोहली झे. कॉक गो. त्सोत्सोबे 00 05 0 0
रहाणे झे. कॉक गो. मोर्केल 08 17 1 0
रैना झे. मिलर गो. मोर्केल 36 50 3 0
धोनी झे. कॉक गो. फिलेंडर 19 31 0 0
जडेजा झे. डिव्हिलर्स गो.त्सोत्सोबे 26 34 1 1
अश्विन झे. कॉक गो. स्टेन 15 26 1 0
मो. शमी त्रि. गो. त्सोत्सोबे 08 14 0 0
उमेश यादव त्रि. गो. स्टेन 01 05 0 0
इशांत शर्मा नाबाद 00 02 0 0
अवांतर : 14. एकूण : 35.1 षटकांत सर्वबाद 146 धावा. गोलंदाजी : डेल स्टेन 7-1-17-3, त्सोत्सोबे 7.1-0-25-4, मोर्केल 6-0-34-2, फिलेंडर 6-1-20-1, ड्युमिनी 5-0-20-0, मॅक्लारेन 4-0-25-0.
सामनावीर : डी. कॉक


डी कॉक, आमलाची शतके... वाचा पुढील स्‍लाईडमध्‍ये...