आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • India Looses T 20 World Cup Final Stone Peleted At Yuvaraj Singh\'s House In Chandigarh

युवराज पराभवाचा खलनायक? क्रिकेट फॅन्सचा भडका; युवीच्या घरावर दगडफेक

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

चंदिगड- टीम इंडियाच्या हातून दुसरा आयसीसी टी -20 विश्वचषक निसटला. अंतिम सामन्यात श्रीलंकेने भारताला सहा गड्यांनी सहज मात दिली. युवराज सिंह हाच टीम इंडियाच्या पराभवाचा खलनायक असल्याचे मानले जात आहे. भारताचा पराभव झाल्यानंतर क्रिकेट फॅन्सनी संताप व्यक्त करत रस्त्यावर उतरले. युवराज सिंहच्या घरावर दगडफेक केली. त्यानंतर युवराजच्या घराबाहेर सुरक्षा व्यवस्था वाढविण्यात आली आहे.

भारताच्या पराभवराला युवराज जबाबदार असल्याचे मानले जात आहे. युवीने 21 चेंडूत केवळ 11 धावा करून श्रीलंकेला विजयाची संधी मिळवून दिली. जमावाला शांत करण्यासाठी युवीची वडील योगराजसिंह घराबाहेर आले. भारताच्या पराभवाला केवळ युवी जबाबदार नसल्याचे त्यांनी सांगितले. परंतु, क्रिकेटचे चाहते ऐकण्याच्या मन:स्थितीत नव्हते. त्यानंतर घराबाहेर सुरक्षारक्षक तैनात करण्यात आले. दरम्यान, सोशल मीडियातही युवराजवर मोठी टीका केली जात आहे.

दरम्यान, युवराजसाठी अंतिम सामन्याचा दिवस चांगला नव्हता. त्याने चांगली खेळी होण्यासाठी शंभर टक्के प्रयत्न केले होते. परंतु, मैदानात उतरताच चौकार-षटकार खेचणे सोपे नसते, असे म्हणत भारतीय संघाचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीने युवराजचा बचाव केला आहे.

पराभवाचे खलनायक
>सर्वांत मोठा गुन्हेगार ठरला युवराज. त्याने 21 चेंडूंत केवळ 11 धावा केल्या. यात चौकार, षटकार नाहीच.
> दुसरा गुन्हेगार धोनी. रैनाऐवजी तो स्वत: फलंदाजीसाठी आला. ढिम्म खेळ केला. द. आफ्रिकेविरुद्ध रैनानेच चौफेर फटकेबाजी करत डाव उलटवला होता.

पुढील स्लाइड्‍सवर वाचा, युवराजबाबतच्या काही ट्वीट्सचे स्‍क्रीनशॉट...