आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिखाऊपणा नव्हे, धाडसामुळे मिळताे विजय!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
विराट काेहली अाणि रवी शास्त्री अाता कदाचित काही दिवस फार जास्त बाेलणार नाहीत. शक्यताेवर भारतीय संघ मालिकेतील दाेन्ही कसाेटी जिंकत नाही, ताेपर्यंत तरी. पहिल्या तिन्ही दिवशी अापला दबदबा निर्माण करणाऱ्या भारतीय संघाचा कसाेटीत अशाप्रकारे पराभव हाेईल, याचा विचारही काेणी केला नसेल. माेठमाेठे दावे अाणि अाक्रमक दिखाऊपणाच्या बळावर सामने जिंकले जाऊ शकत नाही, असे श्रीलंकेच्या विजयाने दाखवून दिले. याचाच शाेध भारतीय संघाचा कर्णधार अाणि टीम डायरेक्टरने केला. याच स्तरावर विजय हा धाडसीपणा, दबावात खेळण्याची क्षमता अाणि महत्त्वाकांक्षेच्या बळावर मिळताे.

तसेही काही निर्णय हे भारतीय संघाच्या विरुद्ध गेले. मात्र, हेच पराभवाचे कारण अाहे, असे म्हणणेच चुकीचे ठरू शकते. अाणि याच पराभवातून भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या डीअारएसबद्दलच्या निरुत्साहाची अाठवण करून दिली. मात्र, पराभवाच्या उंबरठ्यावर असतानाही दमदार पुनरागमन करून श्रीलंकेने मिळवलेल्या विजयाकडे अापल्याला दुर्लक्ष करून चालणार नाही. नुकताच अशाप्रकारचा सनसनाटी विजय इंग्लंडच्या टीमनेही मिळवला. या टीमने विजयाचा प्रबळ दावेदार असलेल्या अाॅस्ट्रेलियाला धूळ चारली.

भारतीय क्रिकेटवर लक्ष ठेवून असलेल्या चाहत्यांना १९९६ मधील पराभवाची नक्कीच अाठवण झाली असेल, जेव्हा वेस्ट इंडीजविरुद्ध १२० धावांचा पाठलाग करणाऱ्या भारतीय संघाचा ८१ धावांत धुव्वा उडाला हाेता. याशिवाय गाॅले कसाेटी, १९८१ च्या हेडिंग्ले अाणि २००१ च्या काेलकाता कसाेटीसमीप हाेती. दाेन्ही कसाेटी हारणारी टीम अाॅस्ट्रेलियाच हाेती. विजेत्यामध्ये भारत अाणि भारताचा समावेश हाेता. हेडिंग्ले, काेलकाता अाणि गाॅले कसाेटीत केवळ एकमेव अंतर अाहे, ते म्हणजे पराभूत झालेल्या टीमने फाॅलाेअाॅन दिले नाही. मात्र, सामन्यावर भारताची एवढी मजबूत पकड हाेती, जेवढी हेडिंग्ले अाणि काेलकाता कसाेटीत अाॅस्ट्रेलियाची हाेती. या कसाेटीत दिनेश चांदीमलने तसेही शानदार खेळी करून कलाटणी दिली हाेती, जसे २००१ मध्ये लक्ष्मण (२८१) व १९८१ मध्ये इयान बाॅथमने (१४९) दिली हाेती. यासाठी प्रतिभाच नव्हे, तर जिगरही लागताे. त्यावेळी लक्ष्मण अाणि बाॅथमच्या खेळीला हरभजन अाणि बाॅब विलिसच्या गाेलंदाजीची साथ मिळाली हाेती. या वेळी चांदीमलला हेराथने महत्त्वाची साथ दिली.

या पराभवातून भारतीय संघाचे पुनरागमन साेपे नाही. टीमचा विचार केल्यास, राेहित शर्मा अाणि हरभजन सिंगने सपशेल निराशा केली. याच कारणामुळे अागामी कसाेटीत त्याच्या खेळण्याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण केले जात अाहे. तसेही कर्णधार विराट काेेहली अाणि टीमचे संचालक पाच गाेलंदाजांचा अापला डावपेच कायम ठेवतात की, त्यात बदल करतात, अाता हे पाहणे अधिक राेचक ठरेल. मात्र, टीमने पाच गाेलंदाजांच्या अापल्या रणनीतीला पुढे कायम ठेवले पाहिजे, असे मला वाटते. चार गाेलंदाज भारताला विजय मिळवून देऊ शकतात. फलंदाजांच्या निराशाजनक खेळीमुळे पराभव झाल्याचे काेहलीने स्पष्ट केले. हे माेठे स्पष्टीकरण अाहे.