आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • India New Zealand First Test Draw, Vijay Zol Made Century

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

भारत- न्यूझीलंड पहिली कसोटी ड्रॉ, विजय झोलचे शानदार शतक

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

विशाखापट्टणम - जालन्याचा गुणवंत खेळाडू विजय झोलने प्रथमश्रेणी क्रिकेटच्या पदार्पणातील सामन्यात शानदार शतक ठोकले. त्याने तीनदिवसीय अनधिकृत पहिल्या कसोटीत न्यूझीलंडविरुद्ध शुक्रवारी 110 धावांची खेळी केली. या सामन्यातून त्याने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये दमदार पदार्पण केले. झोलशिवाय अभिषेक नायरने (102) शतक ठोकले. शुक्रवारी तिस-या दिवशी भारतीय अ संघाने सात गड्यांच्या मोबदल्यात 388 धावा काढल्या होत्या. यासह ही कसोटी ड्रॉ झाली.

भारताने 78 धावांची आघाडी मिळवली होती. न्यूझीलंडने प्रथम फलंदाजी करताना 310 धावा काढल्या होत्या. या कसोटीचा पहिला दिवसाचा खेळ पावसामुळे होऊ शकला नाही. दुस-या दिवशी न्यूझीलंडने धावांचा डोंगर रचला. ऑस्ट्रेलियातील तिरंगी क्रिकेट स्पर्धेतील चॅम्पियन भारतीय संघाचा कर्णधार विजय झोलने 153 चेंडूंत 19 चौकार व एका षटकारासह 110 धावा काढल्या. सलामीवीर जीवनज्योत सिंगने 114 चेंडूंत आठ चौकारांच्या साह्याने 48 धावा काढल्या. मनप्रीत जुनेजाने 67 चेंडूंत तीन चौकार व दोन षटकारांसह 43 धावांची खेळी केली.