आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जूनमध्ये भारताचा बांगलादेश दाैरा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - अागामी जूनमध्ये महेंद्रसिंग धाेनीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ बांगलादेशचा दाैरा करणार अाहे. या दाै-यामध्ये दाेन्ही संघांमध्ये एका कसाेटीसह तीन वनडे सामने हाेणार अाहेत. विश्वचषक क्रिकेट स्पर्धेनंतर टीम इंडियाचा हा पहिला दाैरा असेल.
पाकिस्तानविरुद्धच्या वनडे मालिका विजयाने बांगलादेशचा अात्मविश्वास द्विगुणित झाला अाहे. पाकविरुद्धच्या दाेन्ही कसाेटींत बांगलादेशच्या टीमने माेठी धावसंख्या उभी केली हाेती.
भारतीय संघाच्या २१ दिवसांच्या या दाै-याला ७ जूनपासून प्रारंभ हाेणार अाहे. टीम इंडिया ७ जून राेजी बांगलादेशकडे रवाना हाेईल. त्यानंतर ८ अाणि ९ जून राेजी सरावाचे अायाेजन केले अाहे. दाै-यातील एकमेव कसाेटीला १० जून राेजी सुरुवात हाेईल. फातुल्लाच्या मैदानावर या कसाेटीचे अायाेजन करण्यात अाले.

दाै-यातील पहिला वनडे १८ जून राेजी खेळवला जाईल. त्यानंतर २१ अाणि २४ जून राेजी अनुक्रमे दुस-या अाणि तिस-या वनडेचे अायाेजन करण्यात अाले. या तीन वनडे सामन्यांदरम्यान सरावासाठी राखीव दिवस ठेवण्यात अाला अाहे.

असा असेल दाैरा
७ जून भारतीय संघ रवाना
१० ते १४ जून पहिली कसाेटी
१८ जून पहिला वनडे
२१ जून दुसरा वनडे
२४ जून तिसरा वनडे
२६ जून संघ मायदेशी