आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फायनलपेक्षा भारत-पाक सामना अधिक महत्त्वाचा : सचिन

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकरने शनिवारपासून सुरू होत असलेल्या अकराव्या विश्वचषकात गतचॅम्पियन भारताच्या बाजूने कौल देताना भारत-पाक सामना फायनलपेक्षाही अधिक महत्त्वपूर्ण असल्याचे म्हटले. विश्वचषकासाठी टीम इंडियाला शुभेच्छा देताना सचिन म्हणाला, धोनीच्या नेतृत्वात चॅम्पियन बनण्याची पूर्ण क्षमता भारतीय संघात आहे. भारतीय संघ असा पराक्रम करू शकतो. सचिनने सेमीफायनलसाठी भारताशिवाय ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड आणि द. आफ्रिकेला फेव्हरेट सांगितले. आताच्या भारतीय संघापेक्षा मागचा विश्वविजेता संघ अधिक संतुलित होता. संघाला प्रमुख खेळाडूंची अनुपस्थिती जाणवेल. मात्र, धोनी, विराट, रोहितसारखे खेळाडू सामन्याचे चित्र बदलू शकतात, असे सचिन म्हणाला.