आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानवी दिल्ली- पाकिस्तानी सैनिकांकडून भारतीय जवानाची हत्या केल्याच्या घटनेनंतर दोन्ही देशांमध्ये तणाव निर्माण झाला आहे. त्याचा परिणाम खेळांवरही झाला आहे. हॉकी इंडिया लिगमध्ये पाकिस्तानी खेळाडुंना विरोध झाल्यानंतर आता महिला विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतही पाकिस्तानी संघाच्या सामन्यांवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. तर नुकत्याच हाती आलेल्या माहितीनुसार, हॉकी इंडिया लिगमध्ये सहभागी झालेले सर्व 9 पाकिस्तानी हॉकीपटू मायदेशी परतणार आहेत.
पाकिस्तानी महिला संघाचे सामने मुंबईत होणार होते. ते आता हलविण्यात येणार आहेत. मुंबईऐवजी अहमदाबादला हे सामने होण्याची शक्यता आहे. यासंदर्भात आयसीसी अंतिम निर्णय घेईल, असे बीसीसीआयकडून सांगण्यात आले आहे. यासंदर्भात आयसीसीला माहिती देण्यात आली असून ते आढावा घेऊन निर्णय घेतील, असे बीसीसीआयचे अध्यक्ष एन. श्रीनिवासन यांनी सांगितले. स्पर्धेला 28 जानेवारीपासून सुरुवात होणार आहे.
पुढे वाचा.... एकही पाकिस्तानी खेळाडू मैदानावर उतरला नाही
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.