आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारत-पाक क्रिकेट मालिका व्हायला पाहिजे काय ?

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भारत आणि पाकिस्तान यांच्यात द्विपक्षीय क्रिकेट मालिका आयोजित व्हायला पाहिजे काय ? हे शक्य आहे काय ? आवश्यक आहे काय ?..मागच्या आठवड्यात मी माझ्या ट्विटर अकाउंटवर हे प्रश्न उपस्थित केले होते. पाकिस्तान क्रिकेट मंडळाकडून (पीसीबी) भारत-पाक क्रिकेट मालिका आयोजनाच्या प्रस्तावावर लोक काय विचार करतात, हे मला माहिती करून घ्यायचे होते. भारत, पाक किंवा तटस्थ स्थानावर ही मालिका खेळण्यासाठी पीसीबी तयार आहे.
प्रश्ननांची उत्तरेही रोचक होती. भारतीय चाहत्यांत मतभेद दिसले. अनेक भारतीयांनी यावर जोरदार आक्षेप घेतला. मात्र, ही मालिका लवकर व्हायला हवी, असे प्रत्येक पाकिस्तानी चाहत्याचे मत होते. एकूणच सर्व मतांचा विचार करून ही मालिका तटस्थ स्थानावर व्हायला हवी, असे चित्र निर्माण झाले.
राष्ट्रीय राजकारणात भारत-पाकिस्तान नेहमी लढण्यास सज्ज असतात. मात्र, क्रिकेटच्या राजकारणात भारतीय मंडळ (बीसीसीआय) आणि पीसीबी एकत्र असल्याचे दिसून येते. पाकिस्तान, र्शीलंका, बांगलादेश, झिम्बाब्वे अशा असोसिएट देशांचे मजबूत सर्मथन मिळत असल्यामुळेच आयसीसीमध्ये बीसीसीआयची ताकद दिसून येते. दोन्ही मंडळाच्या जोडीचा हा प्रवास 1987 विश्वचषकाचे यजमानपद मिळवण्यापासून सुरू झाला. त्या वेळी बीसीसीआयचे अध्यक्ष एन.के.पी. साळवे आणि पीसीबीचे प्रमुख नूर खान यांनी ऑस्ट्रेलिया-इंग्लंडचे वर्चस्व संपवून पहिल्यांदा विश्वचषकाचे आयोजन इंग्लंडबाहेर करण्यात मोठे यश मिळवले होते. एकाच उपखंडात असल्यामुळे बीसीसीआय-पीसीबीची मैत्री आहे, असे नाही. भारतीय मंडळाची र्शीमंतीसुद्धा याचे एक कारण आहे. याचाच अर्थ मैत्रीतही दोघांचे वैयक्तिक स्वार्थ आहे. असे असले तरीही दोन्ही देशांच्या बिघडलेल्या राजकीय संबंधामुळे पाकिस्तान क्रिकेट मोठय़ा प्रमाणावर प्रभावित होत राहिले. विशेषत: गेल्या काही वर्षांत.
दोन्ही देशांचे संघ विश्वचषक 2011 आणि यावर्षी आशिया चषकात समोरासमोर होते. दोन्ही देशांत अखेरची द्विपक्षीय मालिका 2007 मध्ये खेळवण्यात आली होती. मुंबई अतेरिकी हल्ल्यानंतर (2008) अनेक भारतीय पाकिस्तानसोबत क्रिकेट.. असे म्हणताच भडकतात. 2009 मध्ये लाहोर येथे श्रीलंका क्रिकेट टीमवर झालेल्या अतिरेकी हल्ल्यानंतर पाक क्रिकेटची स्थिती अधिकच वाईट झाली. आता कोणत्याच संघाला पाकिस्तानात जाण्याची इच्छा नाही. दुसर्‍या देशांच्या निमंत्रणानंतरच खेळण्यास पाकिस्तान मजबूत आहे. तटस्थ स्थानावर खेळणे, हा दुसरा पर्याय पाककडे आहे. मात्र, हा तोट्याचा व्यवहार ठरतो. नुकत्याच दुबई येथे झालेल्या पाक-इंग्लंड आणि पाक-श्रीलंका मालिकेत प्रेक्षकांचा प्रतिसाद खूप तोकडा होता. याचाच अर्थ पाककडून भारतासोबत क्रिकेट खेळण्याचा आग्रह करण्यामागे आर्थिक कारणसुद्धा आहे. खरे तर नेहमी शासनाला ठेंगा दाखवून बीसीसीआय स्वत:चे निर्णय घेत असते. मात्र, पाकसोबत क्रिकेटचे संबंध सुरू करण्यासाठी बीसीसीआयला शासनाच्या निर्णयानुसारच चालावे लागते.
गेल्या काही वर्षांत कसोटी क्रिकेटची लोकप्रियता कमी झाली आहे,. अशा परिस्थितीत भारत-पाक मालिकेने कसोटीला फायदा होईल, असे चाहत्यांचे म्हणणे आहे. मात्र, हे सर्वांनाच माहिती आहे की, हे फक्त खेळाचे संबंध नाहीत. गेल्या काही दिवसांत दोन्ही देशांत व्यावसायिक संबंधही वाढले आहेत. गेल्या काही दिवसांपूर्वी झालेल्या अबू जिंदालच्या अटकेनंतर दोन्ही देशांत पुन्हा दुरावा निर्माण झाला. या संबंधामुळे दोन्ही देशांत क्रिकेट मालिका आयोजनात मदत होईल काय ? हा मोठा प्रश्न आहे. याचे कोणतेच स्पष्ट उत्तर नाही.