आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • India Pakistan Cricket Match News In Marathi, BCCI, PCB, Divya Marathi

भारत-पाकिस्तान दरम्यान यूएईत होणार मालिका ?

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - संयुक्त अरब अमिरातमध्ये (यूएई) आयोजित आयपीएल-7 च्या यशाने भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) आणि पाकिस्तान क्रिकेट मंडळ (पीसीबी) यांच्यादरम्यानच्या कटुतेला दूर करून टाकले आहे. या वर्षी दोन्ही देशांदरम्यान येथे चॅम्पियन्स लीग खेळली जाऊ शकते, असे संकेत बीसीसीआयचे हंगामी अध्यक्ष सुनील गावसकर यांनी दिले आहेत. 14 वर्षांपूर्वी शारजामध्ये घडलेल्या मॅच फिक्सिंग प्रकरणानंतर बीसीसीआयने येथे खेळण्यास उत्सुकता दाखवली नाही. परंतु आयपीएल-7 च्या पहिल्या टप्प्यातील 20 सामन्यांचे यूएईत यशस्वी आयोजन झाल्यामुळे दोन्ही मंडळांना आशेची किरणे दिसू लागली आहेत.

संयुक्त अरब अमिरातमध्ये आयपीएलची प्रचंड क्रेझ बघायला मिळाली. स्पर्धेतील आतापर्यंतचे सर्व सामने हाऊसफुल होते. त्यामुळे या आयोजनाबाबत फ्रँ चायझी आणि खेळाडू खुश आहेत, अशा शब्दांत सुनील गावसकरने यूएईची प्रशंसा केली आहे. सोबतच रवी शास्त्रीनेही त्यांना समर्थन दिले आहे.

बीसीसीआयची अनुत्सुकता
मॅच फिक्सिंग प्रकरणामुळे बीसीसीआयने टीम इंंडियाला यूएईत खेळण्यास मनाई केली होती. 29 ऑक्टोबर 2000 मध्ये कोका कोला चॅम्पियन्स ट्रॉफीत भारत आणि श्रीलंकेदरम्यान अंतिम सामना खेळला गेला होता. या सामन्यात टीम इंडिया एकदिवसीय सामन्यातील आपल्या सर्वाधिक कमी अर्थात 55 धावांवर ऑलआऊट झाली होती. त्यानंतर 2005 मध्ये भारताने पाकिस्तानविरुद्ध दोन सामन्यांची डीएलएफ मालिका खेळली होती.

दीर्घ प्रतीक्षेनंतर खेळणार भारत
यूएईत आयपीएल-7 चे यशस्वी आयोजन झाल्यामुळे पाकिस्तानी क्रिकेट मंडळानेही सुटकेचा नि:श्वास सोडला आहे. कारण भारताविरुद्ध मालिका खेळण्यासाठी पीसीबी आतापर्यंत तटस्थ ठिकाण शोधत होती. भारताच्या दिग्गज क्रिकेटपटूंनी दिलेल्या या संकेतांमुळे बीसीसीआय लवकरच यूएईमध्ये आंतरराष्‍ट्रीय सामने खेळण्यास टीम इंडियाला परवानगी देऊ शकते.