आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • India Pakistan Cricket Match Will Show On Doordarshan, Supreme Court Judgement

भारत-पाकिस्तान सामना दूरदर्शनवर! सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्वाळा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - सर्वोच्च न्यायालयाने विश्वचषकातील भारत आणि पाकिस्तान सामना दूरदर्शनवर दाखवण्याला परवानगी दिली. हा सामना १५ फेब्रुवारी रोजी होणार आहे. गत आठवड्यात दिल्ली उच्च न्यायालयाने दूरदर्शनवरील या सामन्याच्या प्रक्षेपणाला मनाई केली होती. या प्रकरणी प्रसार भारतीने दाखल केलेल्या अपिलावर मंगळवारी सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश रंजन गोगाई आणि पिनाकी चंद्रा घोषच्या खंडपीठाने सुनावणी केली. त्यांनी या प्रकरणाची सुनावणी १७ फेब्रुवारीला करण्याचे स्पष्ट करून अंतिम आदेश दिला. यात यादरम्यान, उच्च न्यायालयाच्या आदेशाला मनाई असेल, असेही स्पष्ट केले.

हा वाद सोडवण्यासाठी आपले प्रस्ताव दाखल करावे, असेही खासगी वृत्तवाहिनी आणि भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला सर्वोच्च न्यायालयाने सांगितले. स्टार इंडियाचे वकील पी. चिदंबरम म्हणाले की, न्यायालयाने या प्रकरणाची सुनावणी लवकर करावी. कारण १४ फेब्रुवारीपासून वर्ल्डकपला प्रारंभ होणार आहे. प्रसारणाला मनाई केल्याने कंपनी ग्राहकामागे १८ रुपयांचा खर्च करू शकणार नाही. असेही त्यांनी या वेळी सांगितले आहे.

तसेही आपण २००७ ची स्थिती कायम ठेवू. सात वर्षांपासून हीच व्यवस्था आहे. वर्ल्डकपचे आयोजन होत राहील. मात्र, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय कायमस्वरूपी राहील, असेही खंडपीठाने नमूद केले.रविवारी होणा-या भारत व पाकिस्तान संघातील सामन्याच्या प्रक्षेपणास दिल्ली उच्च न्यायालयाने मनाई केली होती.