आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

WC 2015 : भारत-पाक खुन्नस, ही आहेत क्रिकेट संघांची बलस्थाने, कमकुवत बाजू

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भारत-पाकिस्तान... जगाच्या नकाशावर एकमेकांना खेटून असलेल्या या दोन देशांमध्ये नेहमीच संघर्षाचे नाते राहिलेले आहे. क्रिकेटच्या मैदानावर तर जणू दोघांचे हाडाचे वैरच. त्याहूनही दोन्ही देशांचे क्रिकेट चाहते या सामन्याला स्वतःच्याच प्रतिष्ठेचा मुद्दा समजत असतात. अशाच या पारंपरिक प्रतिस्पर्ध्यांची विश्वचषक मोहिमेची सुरुवात एकमेकांच्या विरोधात होणाऱ्या सामन्यातून होणार आहे. रविवारी सुटीच्या दिवशी रंगणाऱ्या या लढाईवर कोट्यवधी नजरा खिळलेल्या असतील.

भारत आणि पाकिस्तान दोन्ही देशांचा पहिलाच सामना असल्याने यातील विजयावर संपूर्ण स्पर्धेतील आत्मविश्वास अवलंबून असेल. तसे पाहता एकमेकांच्या विरोधात खेळताना नेहमीच या दोन्ही देशांचे खेळाडू अक्षरशः पेटून उठलेले असतात. केवळ विजय हेच एकमेव लक्ष्य दोन्ही संघांसमोर असते. विश्वचषक स्पर्धेचा इतिहास पाहाता, भारत पाकिस्तानवर वरचढच राहिलेला आहे. भारताने विश्वचषक स्पर्धेत पाकिस्तानविरुद्धच्या प्रत्येक सामन्यात विजयी कामगिरी केली आहे.

आतापर्यंत झालेल्या 10 विश्वचषक स्पर्धांमध्ये भारत आणि पाकिस्तान पाच सामन्यांत समोरासमोर आले आहेत. त्यापैकी प्रत्येत सामन्यात भारताचा विजय झालेला आहे. पाकिस्तानला एकाही सामन्यात भारताचा पराभव करण्यात यश मिळालेले नाही. त्यामुळे भारत विजयाची परंपरा कायम ठेवून विश्वचषकाचा विजयी शुभारंभ करण्याच्या प्रयत्नात असेल, तर पाकिस्तानही आतापर्यंत इतिहास बदलण्याच्या इराद्यानेच पूर्ण तयारीनिशी मैदानात उतरणार आहे.
भारताची बलस्थाने आणि त्रुटी
आजवर विश्वचषकात पाकिस्तानविरोधात भारत अपराजित ठरला आहे, हा आत्मविश्वास वाढवणारा सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे. त्यात अफगाणिस्तान विरोधात झालेल्या सामन्यात रोहित शर्माचा तडाखा पुन्हा एकदा दिसल्याने, सचिनची जागा तो भरून काढण्याची अपेक्षा आहे. मधल्या फळीसाठी विराट कोहलीवर सगळे डोळे झाकून विश्वास करत आहेत. फलंदाजी भारताची जमेची बाजू असून ती भक्कम दिसतही आहे. पण त्याचवेळी गोलंदाजीबाबतच्या चिंता कमी झालेल्या नाहीत. त्यामुळे पाकिस्तानविरोधातील सामन्यानंतरच नेमकी प्रत्यक्ष मैदानावर संघ काय कामगिरी करतो हे स्पष्ट होणार आहे.
पाकिस्तानची बलस्थाने आणि त्रुटी
कर्णधार मिसबाह उल हकसह आफ्रिदी, युनूस खान आणि उमर अकमल यांच्यासह नव्या दमाच्या फलंदाजांमुळे पाकिस्तानची फलंदाजीची बाजूही भक्कम आहे. त्यात उंचपुरा गोलंदाज मोहम्मद इरफानवर सगळ्यांच्याच नजरा असतील. गोलंदाजी हे नेहमीच पाकिस्तानचे बलस्थान ठरले आहे. पण यावेळी जखमी वेगवान गोलंदाज उमर गुल आणि फिरकीपटू सईद अजमलच्या अनुपस्थितीमुळे गोलंदाजीची बाजू काहीशी कमकुवत जाणवते. पण प्रशिक्षक वकार युनूस याने त्यासाठी पर्यायी रणनीती तयार ठेवलेली असणार हे नक्की.
पुढील स्लाइडवर वाचा, पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यात कोण कोण असेल भारतीय संघात...