आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

U-19 आशिया चषकः भारत-पाकिस्‍तानातील चित्तथरारक अंतिम सामना 'टाय'

11 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

क्‍वालालंपूर- एकोणीस वर्षांखालील आषिया चषक स्‍पर्धेत भारत आणि पाकिस्‍तान या कट्टर प्रतिस्‍पर्ध्‍यांमध्‍ये रंगलेला अंतिम सामना चित्तथराक ठरला. भारताचे विजेतेपद थोडक्‍यात हुकले. अखेरच्‍या चेंडुवर पाकिस्‍तानला हा सामना टाय करण्‍यात यश मिळाले. कर्णधार उन्‍मुक्त चांदचे झुंझार शतक भारताला विजय मिळवून देण्‍यात कमी पडले. भारताला निर्धारीत 50 षटकांमध्‍ये 8 बाद 282 धावांपर्यंतच मजल मारता आली. दोन्‍ही संघांना संयुक्त विजेतेपद देण्‍यात आले.
पाकिस्‍तानने सामी असलम याच्‍या तडफदार शतकाच्‍या जोरावर 9 बाद 282 धावांपर्यंत मजल मारली. विजयाच्‍या इराद्याने मैदानात उतरलेल्‍या भारतीय फलंदाजांनी झुझार खेळ केला. सलामीवीर मनन व्‍होरा बाद झाल्‍यानंतर कर्णधार चांदने सामन्‍याची सुत्रे हातात घेतली. तिस-या क्रमांकावर उतरलेल्‍या अपराजितसोबत त्‍याने 175 धावांची भागीदारी केली. अपराजित बाद होताच सामना फिरला. अपराजितने 90 धावा केल्‍या. त्‍यानंतर आलेला मराठवाड्याचा विजय झोल 11 धावा काढून बाद झाला. अखेरच्‍या षटकात विजयासाठी 7 धावांची गरज असताना चांद बाद झाला. त्‍याने 121 धावांची झुंझार खेळी केली. तो बाद झाल्‍यानंतर पुढच्‍याच चेंडुवर कालारियाने चौकार खेचला. अखरेच्‍या चेंडुवर 1 धाव हवी असताना तो बाद झाला. अखेरचे षटक अतिशय थरारक ठरले. अखेरच्‍या षटकात दोन बळी घेऊन भारताचा विजय रोखणारा एहसान आदिल पाकिस्‍तानसाठी हिरो ठरला.
टीम इंडियामध्‍ये प्रवेशासाठी हे आहेत प्रबळ दावेदार
जालन्याच्या विजय झोलची पाकविरुद्ध शतकी झुंज
सचिनला पाहून त्‍याने म्‍हटले होते \'हा काय खेळणार क्रिकेट...
भारत-पाक क्रिकेट संबंध पूर्ववत करण्याचे प्रयत्न