आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डिसेंबरमध्‍ये भारत - पाकिस्तान यांच्यात क्रिकेट मालिका खेळण्यावर एकमत

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कोलकाता - भारत आणि पाकिस्तान यांच्यात क्रिकेट मालिका खेळण्यावर एकमत झाले आहे. दोन्ही देश आठ वर्षांत पाच मालिका खेळतील. पहिली मालिका येत्या डिसेंबरमध्ये यूएईत खेळवली जाईल. यात ५ कसोटी, ५ वनडे आणि २ टी-२० सामने असतील.पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे चेअरमन शहरयार खान यांनी रविवारी ही माहिती दिली. त्यांच्यासोबत बीसीसीआयचे अध्यक्ष जगमोहन दालमिया हेही उपस्थित होते.

आठ वर्षांनंतर मालिका : २००८ मुंबई हल्ल्यानंतर भारत-पाकमध्ये कसोटी मालिका झालेली नाही. उभय देशांनी शेवटच्या वेळेस २००७ मध्ये कसोटी खेळली होती. तथापि, जानेवारी २०१२ मध्ये तीन सामन्यांची वनडे मालिका झाली होती.