आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बहुचर्चित भारत-पाक क्रिकेट सिरिजला मोदी सरकारचा अखेर हिरवा कंदील

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कोलकता- भारत आणि पाकिस्तान क्रिकेट संघांमध्ये क्रिकेट खेळले जाऊ नये यासाठी वातावरण तयार होत असतानाच आज (बुधवार) अखेर सामन्यांवर शिक्कामोर्तब झाले. या वर्षी डिसेंबरमध्‍ये 3 कसोटी, 5 एक दिवसीय आणि 2 ट्वेन्टी-20 सामने खेळले जाणार आहेत.
पाकिस्तान क्रिकेट मंडळाचे (पीसीबी) अध्‍यक्ष शहरयार खान यांनी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) अध्‍यक्ष जगमोहन दालमिया यांची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांचीही भेट घेतली. यावेळी मोदी सरकारने क्रिकेट सिरिजला हिरवा कंदील दिल्याचे वृत्त आहे.
रविवारी (ता.10) शहरयार खान यांनी कोलकात्यात बीसीसीआयचे अध्‍यक्षांची भेट घेतली होती. यावेळी क्रिकेट मालिका आय़ोजित करण्यावर सहमती झाल्याचे खान यांनी सांगितले होते.