आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • India President Pranav Mukherjee News In Marathi

राष्ट्रपती मुखर्जी यांच्याकडून भारतीय संघाला शुभेच्छा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- स्कॉटलंड येथील 20व्या राष्ट्रकुल स्पर्धेत सहभागी झालेल्या भारतीय संघातील खेळाडूंना राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी शुभेच्छा पाठवल्या. यंदाच्या स्पर्धेत 215 सदस्यीय भारतीय संघ सहभागी झाला आहे. ‘या स्पर्धेत भारतीय संघ उल्लेखनीय कामगिरी करेल, याचा मला पूर्ण विश्वास आहे. या सर्व खेळाडूंमध्ये चमत्कार घडवण्याची क्षमता आहे. आपल्या याच अचाट शक्तीच्या बळावर हे सर्व खेळाडू पदक जिंकून देशाच्या नावलौकिकास साजेशी कामगिरी करतील. या सर्व खेळाडूंना माझ्या मनापासून शुभेच्छा,’ अशा शब्दांत मुखर्जी यांनी खेळाडूंना स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.