आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वनडे मालिका विजयासाठी भारत सज्ज!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

विशाखापट्टणम - उन्मुक्त चंदच्या नेतृत्वाखाली भारतीय अ संघ न्यूझीलंडविरुद्ध दोन एकदिवसीय सामन्यांची मालिका जिंकण्यासाठी सज्ज झाला आहे. मालिकेतील दुसरा वनडे सामना मंगळवारी होणार आहे.


यजमान संघाने रविवारी सलामी सामना जिंकून मालिकेत 1-0 ने आघाडी मिळवली. रॉबिन उथप्पाच्या शतकापाठोपाठ धवल कुलकर्णी, राहुल शर्मा, अशोक मनेरिया यांच्या धारदार गोलंदाजीच्या बळावर भारताने 6 गड्यांनी सामना जिंकला. यामध्ये कर्णधार चंदने संघाच्या विजयात 94 धावांचे महत्त्वपूर्ण योगदान दिले. पाहुण्या संघास अवघ्या 257 धावांपर्यंत मजल मारता आली होती. हे आवाक्यातले आव्हान भारताने 4 गड्यांच्या मोबदल्यात लक्ष्य गाठून मालिकेत आघाडी घेतली.


यापूर्वी, भारत अ आणि न्यूझीलंड अ यांच्यातील तीन दिवसीय सराव सामन्यांची मालिका ड्रॉ झाली. या मालिकेच्या माध्यमातुन दोन्ही संघातील खेळाडू राष्‍ट्रीय संघाच्या आगामी दौ-यात स्थान मिळवण्यासाठी स्वत:ला सिद्ध करण्याचा प्रयत्न करत आहेत. यामधील युवा खेळाडूंचा दौ-यासाठी विचार केला जाऊ शकतो.