आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • India Should Ban Of Olympic If Wrestling Not Included Says Geeta

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

भारताने ऑलिम्पिकवर बहिष्कार टाकावा : गीता फोगट

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- आगामी 2020 च्या ऑलिम्पिकमध्ये कुस्तीचा समावेश करण्यासाठी शासनाने गंभीर पावले उचलली पाहिजेत. कुस्तीला जर ऑलिम्पिकमधून बाहेर करण्यात येत असेल तर भारताने ऑलिम्पिक बहिष्काराची घोषणा केली पाहिजे, अशी मागणी लंडन ऑलिम्पिकमध्ये सहभागी होणारी भारतीय महिला कुस्तीपटू गीता फोगट हिने केली.

दिल्लीत एप्रिल महिन्यात होणारी आशियाई कुस्ती आणि मंगोलियात मार्च महिन्यात होणार्‍या विश्वचषक कुस्तीसाठी गीता सध्या तयारी करीत आहे. कुस्तीला ऑलिम्पिक बाहेर करण्याचा निर्णय दु:खद आहे. महिला कुस्तीपटूंसाठी तर हा निर्णय त्यांच्या स्वप्नांवर पाणी फेरण्यासारखा आहे, असेही गीताने म्हटले.