आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कसोटी क्रिकेट: भारत-दक्षिण आफ्रिका मालिका 1-1 ने बरोबरीत

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

प्रिटोरिया- भारत अ आणि दक्षिण आफ्रिका अ संघ यांच्यातील चारदिवसीय दोन कसोटी सामन्यांची मालिका 1-1 ने बरोबरीत राहिली. यजमान आफ्रिका संघाने मंगळवारी 121 धावांनी दुसरी कसोटी जिंकली. यापूर्वी भारतीय अ संघाने पहिली कसोटी डाव व 13 धावांनी जिंकली होती.

दुसर्‍या कसोटीत भारतीय संघासमोर विजयासाठी 307 धावांचे लक्ष्य होते. मात्र, प्रत्युत्तरात भारताला 185 धावांपर्यंत मजल मारता आली. भारताकडून अजिंक्य रहाणे (86) व वृद्धिमान साहाने (77*) या दोघांनी सहाव्या गड्यासाठी केलेली 160 धावांची भागीदारी व्यर्थ ठरली.सुमार फलंदाजीमुळे भारतीय संघाला सामन्यात पराभवाला सामोरे जावे लागले. कर्णधार चेतेश्वर पुजारा (2), मुरली विजय (0), दिनेश कार्तिक (0) व अंबाती रायडू (1) हे फलंदाज दुसर्‍या डावात सपशेल अपयशी ठरले. आफ्रिकेकडून बोरेन हॅड्रिक्सने सहा व सायमन हॅमरने तीन विकेट घेतल्या.
संक्षिप्त धावफलक : द. आफ्रिका : पहिला डाव- 341, दुसरा डाव- 166/5, भारत : पहिला डाव-201, दुसरा डाव- 185