आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कसोटीसाठी टीम इंडियात बदलाची शक्यता कमीच

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटी मालिकेसाठी भारतीय संघनिवडीबाबत फारशी उत्सुकता दिसत नाही. सीनियर खेळाडूंची जागा घेण्याइतपत योग्यता सिद्ध करण्यात नवोदित खेळाडूंना आलेल्या अपयशामुळे पहिल्या दोन कसोट्यांसाठी फारसे बदल न करता संघ निवडला जाईल, अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली.

जखमी खेळाडूंची लांबलचक यादी असलेल्या मध्यमगती गोलंदाजांपैकी कुणीही ‘फिरक्या’ खेळपट्ट्यांवर गोलंदाजी टाकण्यास उत्सुक नाही. भुवनेश्वरकुमार आणि शमी अहेमद या दोन नवोदितांनी मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये उत्तम प्रदर्शन केले होते. मात्र, ईशांत शर्मा, एस. श्रीशांत यांच्या नावाचा विचार आधी होऊ शकेल. कसोटी क्रिकेटचा अनुभव ही एकमेव या दोघांच्या दृष्टीने जमेची बाजू आहे. अश्विन, प्रग्यान ओझा, हरभजनसिंग आणि अमित मिश्रा किंवा पीयूष चावला यापैकी चौघांना संधी मिळू शकेल. संदीप पाटील यांच्या अध्यक्षतेखाली कार्यरत असणारी निवड समिती आक्रमक धोरण अवलंबवेल असे वाटत नाही. मागील ‘पानावरून पुढे चालू’ या धोरणाचा पुरस्कार करून संघ निवडण्यात येईल. याचाच अर्थ इंग्लंडविरुद्ध मालिकेत खेळलेलाच संघ जवळपास कायम असेल.

संभाव्य संघ असा
सलामीवीर
: वीरेंद्र सेहवाग, गौतम गंभीर, मुरली विजय, अजिंक्य रहाणे
मधली फळी : चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, सुरेश रैना, सचिन तेंडुलकर
यष्टिरक्षक: महेंद्रसिंग धोनी
वेगवान गोलंदाज : ईशांत शर्मा, श्रीशांत, डिंडा, भुवनेश्वर यापैकी दोघे.
फिरकी गोलंदाज : आर. अश्विन, प्रग्यान ओझा, हरभजनसिंग, पीयूष चावला यापैकी बहुधा पहिले तिघे.