आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारत-श्रीलंका पहिली कसोटी ड्रॉ

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

दांबुला- भारत व श्रीलंका यांच्यातील 19 वर्षांखालील चारदिवसीय पहिली कसोटी शुक्रवारी ड्रॉ झाली. फॉलोऑन मिळालेल्या श्रीलंकेने 264 धावांची खेळी करून कसोटीतील पराभव टाळला. विजय झोलच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने 503 धावांवर पहिला डाव घोषित केला होता. प्रत्युत्तरात यजमानांची चांगलीच दमछाक झाली. फॉलोऑनच्या नामुष्कीला सामोरे जाणार्‍या लंकेकडून समरविक्रमने 88, सुमनगिरीने 62 धावा काढल्या. गोलंदाजीत भारताच्या कुलदीप यादव, मिलिंद, अतुलसिंग, एस. अय्यरने प्रत्येकी दोन गडी बाद केले.

शुक्रवारी 5 बाद 235 धावांवरून लंकेने चौथ्या दिवशी सुरुवात केली. मात्र, लंकेला अवघ्या 256 धावांपर्यंत मजल मारता आली. कुलशेखरा 76 धावांचे योगदान देऊन तंबूत परतला. लंकेला फॉलोऑन टाळण्यासाठी 119 धावांची आवश्यकता होती. मात्र, पाच फलंदाजांना 21 धावा काढता आल्या. मात्र, अतुलसिंगने तीन आणि मिलिंदने दोन विकेट घेतल्या. यामुळे लंकेला फॉलोऑनच्या नामुष्कीला सामोरे जावे लागले. त्यानंतर लंकेकडून कर्णधार के. मेंडिस (21), डुमिंडू (19), कुलशेखरा (13) हे त्रिकूट झटपट बाद झाले. समरविक्रमने 88 धावांची खेळी करून लंकेचा डाव सावरला. मात्र, त्याला साथ देणार्‍या फलंदाजांना फार काळ मैदानावर आव्हान कायम ठेवता आले नाही.


संक्षिप्त धावफलक
भारत : पहिला डाव-503 (डाव घोषित), श्रीलंका : पहिला डाव- 256 व 9 बाद 264