आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

क्लीन स्वीपच्या इराद्याने खेळणार भारतीय खेळाडू, भारत-श्रीलंका पाचवा वन डे आज

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रांची - टीम इंडिया व श्रीलंकेत मालिकेतील अखेरचा आणि पाचवा एकदिवसीय सामना रविवारी येथील जेएससीए आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळवला जाईल. सामन्यासाठी दोन्ही संघ उत्साहित आहेत. दोन्ही संघांनी शनिवारी जोरदार सराव केला. मालिकेत ४-० ने पुढे असलेली टीम इंडिया हा सामना जिंकून श्रीलंकेला क्लीनस्विप देण्याच्या प्रयत्नात असेल. अखेरचा सामना जिंकून अब्रू वाचवण्याचा प्रयत्न श्रीलंका करेल.
या सामन्यात प्रेक्षकांना आपल्या शहराचा हीरो अर्थात महेंद्रसिंग धोनीला खेळताना पाहता येणार नाही. मात्र, चाहते रोहित शर्माच्या फलंदाजीचा आनंद लुटण्यास आतुर आहेत. रोहितशिवाय विराट कोहली आणि अजिंक्य रहाणे यांचीही चांगली क्रेज आहे. टीम इंडियाने मालिकेतील चारही सामन्यांत श्रीलंकेवर वर्चस्व गाजवले. अखेरच्या सामन्यातही टीम इंडिया फेव्हरेट आहे.
विराटकडून आशा
वनडे क्रिकेटमध्ये २० शतके ठोकलेल्या विराट कोहलीकडून मालिकेतील अखेरच्या सामन्यात शतकाची आशा केली जात आहे. त्याने मालिकेत आतापर्यंत दोन अर्धशतके ठोकली आहेत. विराट चौथ्या क्रमांकावर, तर रैना पाचव्या स्थानी खेळत आहेत. रैना व उथप्पाच्या बॅटीतून कमाल कामगिरीची आशा असेल. अंबाती रायडूने मालिकेत एक शतक साजरे केले आहे. तो मधल्या फळीत जागा निश्चित करण्यावर जोर देऊ शकतो.
रोहितवर लक्ष
दुखापतीतून सावरल्यानंतर सलामीवीराची भूमिका पार पाडणा-या रोहित शर्माने मागच्या सामन्यात २६४ धावांची विश्वविक्रमी खेळी केली होती. आता या सामन्यातही सर्वांचे लक्ष रोहितच्या कामगिरीकडे असेल. सलामीच्या फळीत आपले स्थान पक्केे करण्याच्या लक्ष्याने आणि विश्वचषकाच्या संघात आपले स्थान निश्चित करण्याच्या ध्येयाने रोहित आणखी एक आक्रमक खेळी करून निवड समितीला प्रभावित करू शकतो.
सुरेश रैनाला विश्रांती; केदारला संधी
पाचव्या वनडेसाठी मधल्या फळीचा फलंदाज सुरेश रैनाला विश्रांती देण्यात आली आहे. भविष्यातील व्यग्र कार्यक्रम बघता त्याला विश्रांती देण्यात आली आहे. रैनाच्या जागी केदार जाधवला अंतिम अकरा खेळाडूंत संधी मिळू शकते. उमेश यादव, अक्षर पटेल दमदार
गोलंदाजांवरसुद्धा श्रीलंकेविरुद्ध विजय मिळवून देण्याची जबाबदारी असेल. उमेश यादव व फिरकीपटू अक्षर पटेल यांनी मालिकेत चांगली कामगिरी केली आहे. उमेशने चार सामन्यांत सर्वाधिक १० व अक्षर पटेलने ९ गडी टिपले आहेत.
दोन्ही संभाव्य संघ
भारत : विराट कोहली (कर्णधार), अजिंक्य रहाणे, रोहित शर्मा, अंबाती रायडू, रॉबिन उथप्पा, केदार जाधव, आर. अश्विन, अक्षर पटेल, कर्ण शर्मा, उमेश यादव, धवल कुलकर्णी, आर. विनयकुमार, स्टुअर्ट बिन्नी.
श्रीलंका : अँजेलो मॅथ्यूज (कर्णधार), कुशल परेरा, तिलकरत्ने दिलशान, जयवर्धने, प्रियंजन, डिसिल्व्हा, एल. गमागे, इरंगा, दिनेश चांदिमल, अंजता मेंडिस, लाहिरू िथरिमाने, तिसरा परेरा, नुवान कुलशेखरा.