आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • India Stun World Champions Australia In Azlan Shah Cup

विश्वविजेत्या ऑस्ट्रेलियाला भारतीय हॉकी संघाचा धक्का

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इपोह, मलेशिया - भारताचा युवा स्ट्रायकर निक्कीन थिमय्याने केलेल्या गोल्सच्या हॅट्ट्रिकच्या बळावर भारताने ऑस्ट्रेलियाला ४-२ असे पराभूत करून विश्वविजेत्यांना चकित केले. या विजयामुळे भारताला आता तिसर्‍या-चौथ्या स्थानासाठी होणार्‍या लढतीत खेळण्याची संधी मिळू शकणार आहे.

अझलन शाह चषकाच्या लढतीच्या चारही चरणांत (क्वार्टर्स ) भारताने एकेक गोल करीत विजयावर शिक्कामोर्तब केले. सामन्याच्या पहिल्याच मिनिटाला रघुनाथने पहिला, तर त्यानंतर निक्कीनने २३ मिनिटे, ३२ मिनिटे आणि ६० व्या मिनिटाला गोल करीत भारताला अभेद्य आघाडी मिळवून दिली. ऑस्ट्रेलियाकडून डॅनियल बेलने १४ व्या मिनिटाला, तर मॅट गोडसने ५३ व्या मिनिटाला गोल केल्याने ऑस्ट्रेलियाला पराभवातील फरक काहीसा कमी करणे शक्य झाले.