आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारतीय संघ पाकपेक्षा खूप सरस : इरफान

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- भारतीय संघ हा पारंपरिक कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तान संघाच्या तुलनेत खूपच सरस असून १५ फेब्रुवारीला होणा-या पहिल्या सामन्यात भारत त्यांच्यावर निश्चित मात करेल, असे मत भारताचा काही वर्षांपूर्वीचा प्रमुख अष्टपैलू इरफान पठाणने म्हटले आहे.

विश्वचषकात सामना अत्यंत महत्त्वाचाचे असतात. विश्वचषक चार वर्षांनी होत असल्याने त्यातील सामन्यांचे दडपण चौपट असते. त्यातच तो सामना जर पाकविरुद्धचा असेल, तर त्याचा दबाव कैकपटींनी असतो. त्यामुळे या सामन्यांमध्ये जो संघ दबाव अधिक चांगल्या प्रकारे हाताळू शकतो, तोच यशस्वी होतो, असेही त्याने नमूद केले. टी-२० अंतिम सामना
आम्ही टी -२० च्या विश्वचषकातील साखळी सामन्यात पाकिस्तान संघाविरुद्ध दबाव घ्यायचा नाही, असे ठरवून सामन्यापूर्वी केवळ पाच मिनिटांची बैठक घेतली होती. मात्र, अंतिम सामना पुन्हा पाकबरोबर असताना आपाेआपच दबाव निर्माण झाला. त्यात अखेरच्या षटकापर्यंत रंगलेली चुरस आणि मिसबाहने जोगिंदरच्या त्या चेंडूवर मारलेला ताे फटका, त्यानंतरचा कॅच आणि विजयाचा जल्लोष आजही स्मरणात असल्याचे पठाणने सांगितले.