आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारतात मिळवलेला ताज हॅमिल्टनमध्ये गमावला !

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेतील दुसरा सामना गमावताच टीम इंडिया आयसीसी क्रमवारीच्या अव्वल स्थानावरून पायउतार झाली. एक वर्ष दोन दिवसांपर्यंत या स्थानावर अधिकार गाजवणा-या भारतीय संघाला दक्षिण आफ्रिका दौ-यापासून सातत्याने अपयश मिळत आहे. 2009 मध्ये आंतरराष्‍ट्रीय वनडे क्रमवारीत अव्वल स्थान काबीज केल्यानंतर 19 फेब्रुवारी 2013 ला पुन्हा एकदा या स्थानी विराजमान झाली. रांचीमध्ये खेळल्या गेलेल्या सामन्यात इंग्लंडला 7 गड्यांनी मात देत भारताने ही कामगिरी केली होती. 11 सप्टेंबर 2009 रोजी भारताला फक्त 24 तासांपुरतेच अव्वल स्थान मिळाले होते.
वनडे टॉप-5
संघ गुण
ऑस्ट्रेलिया 118
भारत 117
द.आफ्रिका 110
श्रीलंका 108
इंग्लंड 108