आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • India To Bat First Against West Inties In Tri Series

तिरंगी मालिकेत वेस्‍ट इंडिजचा भारतावर एक गडी राखून विजय

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जमैका- वेस्ट इंडिजने तिरंगी मालिकेत एक गाडी राखून भारतीय संघावर विजय मिळवला. भारताने विजयासाठी 230 धावांचे दिलेले आव्हान इंडिजने 47 षटकात पूर्ण केले. इंडिजने 14 चेंडू बाकी असताना 47 षटकांमध्‍ये 9 गडी गमवून आपले विजयाची गुढी उभारली.

दरम्यान वेस्‍ट इंडिजने नाणेफेक जिंकून भारताला प्रथम फलंदाजी करण्‍याची संधी दिली. भारताने 50 षटकात 7 बाद 229 धावा केल्या. रोहित शर्मासोबत अर्धशतकी भागीदारी केल्‍यानंतर दिनेश कार्तिक बाद झाला. भारताचे दोन फलंदाज लवकर बाद झाल्‍यानंतर सलामीवीर रोहित शर्मा आणि दिनेश कार्तिकने संघाचा डाव सावरला. भारताचा दुसरा फलंदाज 39 धावांवर बाद झाला होता. त्‍यानंतर या जोडीने अर्धशतकी भागीदारी केली. विंडीजच्‍या गोलंदाजांनी टिच्‍चून गोलंदाजी केल्‍यामुळे दोघांना वेगाने धावा काढता आल्‍या नाही. परंतु, दोघांनी धावफलक हलता ठेवत आणखी विकेट्स पडू दिल्‍या नाही. अखेर ही जोडी विंडीजने फोडली. दिनेश कार्तिकला मार्लन सॅम्‍युअल्‍सने स्‍वतःच्‍याच गोलंदाजीवर झेलबाद केले. कार्तिक 23 धावा काढून बाद झाला.

भारताची सलामीची जोडी लवकर फोडल्‍यानंतर वेस्‍ट इंडिजने भारताला दुसरा धक्‍काही लवकर दिला. विराट कोहलीही 11 धावा काढून बाद झाला. डॅरेन सॅमीच्‍या गोलंदाजीवर ख्रिस गेलने दुस-या स्‍लीपमध्‍ये त्‍याचा अप्रतिम झेल घेतला. शिखर धवन 11 धावा काढून बाद झाला. केमार रोचने स्‍वतःच्‍याच गोलंदाजीवर त्‍याचा झेल घेतला. रोहित शर्मा आणि धवनने 25 धावांची सलामी दिली.

एक दिवसीय तिरंगी क्रिकेट मालिकेत आज भारताची लढत वेस्‍ट इंडिजसोबत आहे. वेस्‍ट इंडिजने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला.