आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

भारताचा 9 गडी राखून दणदणीत विजय, शर्मा-रैनाची अर्धशतके

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

हरारे- पदार्पण करणारा चेतेश्‍वर पुजारा अपयशी ठरल्‍यानंतर रोहित शर्मा आणि सुरेश रैनाने टीम इंडियाला दणदणीत विजय मिळवून दिला. भारताने केवळ एका फलंदाजाच्‍या मोबदल्‍यात 30.5 षटकांमध्‍येच विजयी लक्ष्‍य गाठले. रोहित शर्मा 64 आणि सुरेश रैना 65 धावांवर नाबाद राहिले.

पुजारा बाद झाल्‍यानंतर रैनाला कोहलीने बढती देऊन तिस-या क्रमांकावर फलंदाजीला पाठविले. त्‍याने आक्रमक फलंदाजी करीत दडपण कमी केले. त्‍यानंतर रोहित शर्मा आणि रैनाने अर्धशतकी भागीदारी करुन विजयाच्‍या दिशेने आगेकूच सुरु ठेवली. सुरेश रैनाने 6 चौकारांनी खेळी सजविली तर, रोहितने 1 षटकार आणि 5 चौकार ठोकले.

पुजरा अपयशी ठरला. चताराने त्‍याचा 13 धावांवर त्रिफळा उडविला. रोहित शर्मा आणि चेतेश्‍वर पुजारा या नव्‍या जोडीने संयमी सलामी दिली. पुजाराने या सामन्‍यात पदार्पण केले. ही संधी त्‍याला दवडू द्यायची नाही. त्‍यामुळे तादेखील कोणताही धोका न पत्‍कारता खेळत होता. परंतु, चताराच्‍या एका चेंडुवर तो फसला आणि बॅट-पॅडमधील गॅपमधून चेंडू थेट लेग स्‍टंपवर आदळला. पहिल्‍या 10 षटकांमध्‍ये या जोडीने केवळ 23 धावा काढल्‍या. परंतु, रैनाने फटकेबाजी केलीच, शिवाय एकेरी आणि दुहेरी धावा काढत धावफलक हलता ठेवला.