आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

टीम इंडियाकडून क्लीन स्वीप; मालिका 5-0 ने जिंकली, झिम्बाब्वेवर सात गड्यांनी मात

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बुलावायो- युवा कर्णधार विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारताने पाचव्या आणि अखेरच्या वनडे क्रिकेट सामन्यात 7 गड्यांनी विजय मिळवत झिम्बाब्वेला मालिकेत 5-0 ने हरवले. भारताने विदेशी भूमीवर द्विपक्षीय मालिका पहिल्यांदा 5-0 ने जिंकली. रवींद्र जडेजाने वॉलरच्या चेंडूवर पूल करून षटकार खेचत भारताला शानदार विजय मिळवून दिला.
पाचव्या वनडेत भारताच्या विजयात उजव्या हाताचा लेगस्पिनर अमित मिश्राने 48 धावांच्या मोबदल्यात 6 गडी बाद करून सिंहाचा वाटा उचलला. फलंदाजीत अजिंक्य रहाणे (50) आणि रवींद्र जडेजा (48*) आणि शिखर धवन (41) यांनी चांगली कामगिरी केली. झिम्बाब्वेने प्रथम फलंदाजी करताना सर्वबाद 163 धावा काढल्या. प्रत्युत्तरात टीम इंडियाने तीन बाद 167 धावा काढून सहज विजय गाठला.

भारतीय फलंदाजांनी या सामन्यात अधिक चांगली फलंदाजी केली. सलामीवीर शिखर धवन आणि अजिंक्य रहाणे यांनी दुसºया विकेटसाठी 55 धावांची, तर रहाणे आणि जडेजा यांनी तिसºया विकेटसाठी 71 धावांची भागीदारी केली. कसोटी क्रिकेटमध्ये यशस्वी खेळाडू चेतेश्वर पुजारा वनडेत फ्लॉप झाला. त्याला या वेळी भोपळासुद्धा फोडता आला नाही. चौथ्या वनडेतसुद्धा तो 13 धावा काढून बाद झाला होता.

भारताने नाणेफेक जिंकून झिम्बाब्वेला प्रथम फलंदाजीसाठी बोलावले. लेगस्पिनर अमित मिश्राच्या (48 धावांत 6 विकेट) कारकीर्दीतील सर्वश्रेष्ठ कामगिरीच्या बळावर भारताने झिम्बाब्वेला 39.5 षटकांत 163 धावांत गुंडाळले.
अमित मिश्राच्या गुगली आणि लेगब्रेक चेंडूंचे झिम्बाब्वेकडे उत्तरच नव्हते. झिम्बाब्वेकडून फक्त सीन विल्यम्सने 51 आणि सलामीवीर हॅमिल्टन मसकदजाने 46 चेंडूंत चार चौकारांच्या मदतीने 32 धावा काढल्या.

अमितचा 18 बळींचा विक्रम
उजव्या हाताचा लेगस्पीनर अमित मिश्राने शेवटच्या सामन्यात 6 तर मालिकेत एकूण 18 बळी टिपले. वर्ल्डकप व चॅम्पियन्स ट्रॉफी वगळता इतर कोणत्याही मालिकेत हा सर्वाधिक बळींचा विक्रम आहे. यापूर्वी श्रीलंकेच्या अजंता मेंडिसने 2008 मधील आशिया कपमध्ये 17 विकेट्स घेतल्या होत्या. चौथ्या वनडेतसुद्धा झिम्बाब्वेच्या फलंदाजांना आपल्या फिरकीच्या तालावर नाचवले होते. मागच्या सामन्यात त्याने 25 धावांत 3 गडी बाद केले होते.

रसूलसाठी मुख्यमंत्री अब्दुल्लांचा ‘टिवटिवाट’
जम्मू-काश्मीरचा ऑफस्पिनर परवेझ रसूलला झिम्बाब्वेविरुद्ध मालिकेत एकाही वनडेत प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळाली नाही. यावर जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांनी ट्विट करून बीसीसीआयला फटकारले. आत्मविश्वास मोडण्यासाठी रसूलला झिम्बाब्वेच्या यात्रेत सामील करण्यात आले काय, असा प्रश्न त्यांनी केला. आयपीएलच्या सहाव्या सत्रात रसूलला पुणे वॉरियर्सकडून खेळण्याची संधी मिळाली होती. मागच्या रणजी सत्रात त्याने 594 धावा काढताना 33 विकेटही घेतल्या होत्या. या आधारावर त्याची टीम इंडियात निवड झाली.

धावफलक
झिम्बावे
धावा चेंडू 4 6
सिबांदा झे.कार्तिक गो.उनादकट 5 14 1 0
मसकदजा त्रि.गो. जडेजा 32 46 4 0
टेलर झे.रैना गो. मोहित 0 11 0 0
मारुमा झे. कार्तिक गो. शमी 4 12 0 0
विल्यम्स झे. कोहली गो. मिश्रा 51 65 6 0
वॉलर झे. मोहित गो. मिश्रा 8 18 0 0
चिगुम्बुरा पायचीत गो. मिश्रा 17 37 3 0
मुटोम्बडझी झे.रैना गो. मिश्रा 4 5 0 0
मुशांग्वे त्रि.गो. मिश्रा 16 14 0 2
जार्विस नाबाद 12 12 2 0
विटोरी झे. कोहली गो. मिश्रा 4 8 0 0
अवांतर : 10. एकूण : 39.5 षटकांत सर्वबाद 163. गडी बाद होण्याचा क्रम : 1-13, 2-23, 3-37, 4-45, 5-72, 6-122, 7-126, 8-133, 9-155, 10-163. गोलंदाजी : मोहित शर्मा 6-0-25-1, जयदेव उनादकट 6-1-8-1, रवींद्र जडेजा 10-0-42-1, मो.शमी 7-1-27-1, सुरेश रैना 2-0-9-0, अमित मिश्रा 8.5-0-48-6.

भारत
धावा चेंडू 4 6
पुजारा त्रि.गो. जार्विस 0 4 0 0
धवन झे. टेलर गो. जार्विस 41 38 6 1
रहाणे त्रि.गो. वालर 50 66 4 1
रविंद्र जडेजा नाबाद 48 77 4 2
दिनेश कार्तिक नाबाद 10 19 1 0
अवांतर : 18. एकूण : 34 षटकांत 3 बाद 167. गडी बाद होण्याचा क्रम : 1-0, 2-55, 3-126. गोलंदाजी : जार्विस 8-3-18-2, विटोरी 5-0-41-0, चिगुम्बुरा 4-0-11-0, मुशांग्वे 6-0-26-0, मुटोम्बोडझी 5-0-29-0, विल्यम्स 2-0-18-0, वॉलर 4-0-18-1.