आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • India To Host D 2016 World 20 20,d 2021 World Test Championship & D 50ovr World Cup 2023

क्रिकेट 'मेजवानी': भारत करणार वनडे, टी-20 विश्‍वचषकाचे आयोजन

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लंडन- आंतरराष्‍ट्रीय क्रिकेट मंडळाने (आयसीसी) भारतीय क्रिकेट चाहत्‍यांना खुषखबर दिली आहे. आयसीसीने भारताला तब्‍बल दोन विश्‍वचषकाचे आयोजन करण्‍याची संधी दिली आहे. जगातील सर्वात श्रीमंत असलेल्‍या भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला (बीसीसीआय) 2016चे टी-20 आणि 2023 च्‍या वनडे विश्‍वचषकाचे यजमानपद दिले आहे. त्‍याचबरोबर 2021मध्‍ये होणारी दुसरी कसोटी चॅम्पियनशीपही भारतात होणार आहे.

शनिवारी झालेल्‍या आयसीसीच्‍या वार्षिक बैठकीत हा निर्णय घेण्‍यात आला. या बैठकीत जगमोहन दालमिया यांनी बीसीसीआयचे प्रतिनिधीत्‍व केले. पहिली जागतिक कसोटी चॅम्पियनशीप इंग्‍लंडमध्‍ये 2017 च्‍या जून आणि जुलैमध्‍ये होणार आहे. वर्ष 2019चा वनडे विश्‍वचषक इंग्‍लंड तर 2020ची टी-20 विश्‍वचषक स्‍पर्धा ऑस्‍ट्रेलियामध्‍ये होणार आहे.

इतर महत्‍वाचे निर्णय

1. प्रत्‍येक संघाने चार वर्षांत किमान 16 कसोटी खेळले पाहिजेत अशी शिफारस करण्‍यात आली आहे.

2. वनडे आणि टी-20 रँकिंगचा कालावधी 3 वर्षांवरून 4 वर्षे

3. नवीन रँकिंग एक ऑगस्‍टऐवजी एक मे पासून अपडेट करण्‍यात येणार

4. अफगाणिस्‍तानला मिळाला 17 व्‍या असोसिएट देशाचा दर्जा